ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बावड्यात पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:59+5:302021-02-05T07:06:59+5:30
कसबा बावडा : कसबा बावडा कुटुंब कल्याण केंद्र क्रमांक ५ येथील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या ...

ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बावड्यात पोलिओ लसीकरण
कसबा बावडा : कसबा बावडा कुटुंब कल्याण केंद्र क्रमांक ५ येथील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ लस देऊन लसीकरणाला सुरवात करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत पूजा ऋतुराज पाटील या उपस्थित होत्या. आमदार ऋतुराज पाटील यांचे चिरंजीव अर्जुन ऋतुराज पाटील यांनादेखील याठिकाणी पोलिओ लस देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, माधुरी लाड, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
.. फोटो:
कसबा बावडा कुटुंब कल्याण केंद्र क्रमांक ५ येथे आमदार ऋतुराज पाटील यांचे चिरंजीव अर्जुन यांनाही पोलिओ डोस देण्यात आला. यावेळी पूजा ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, माधुरी लाड, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे आदी उपस्थित होते.