शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांना नवीन घरे अन् मिळणार चकचकीत कार्यालयेही, १८५ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:03 IST

कागल, कळेसाठी नवीन इमारती ; जुना बुधवार, इचलकरंजीतील घरे मिळणार

कोल्हापूर : नव्या वर्षात पोलिसांना नवीन ६७८ घरे मिळणार, तसेच शहापूर आणि कुरुंदवाड पोलिस ठाण्यांचा कारभार नवीन इमारतींमधून चालणार आहे. कागल आणि कळे पोलिस ठाण्यांसाठी लवकरच नवीन इमारतींचे बांधकाम होणार आहे. मुख्यालयात पोलिस क्लबलाही मंजुरी मिळाली आहे.जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारतींमधूनच पोलिस ठाण्यांचा कारभार चालतो. पोलिसांची शासकीय घरेही अपुऱ्या जागेतील आणि जीर्ण आहेत. पोलिस दलाचे आधुनिकीकरण होत असतानाच नवीन इमारतींचे बांधकाम करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील जुना बुधवार पेठ, पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील पोलिसांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. इचलकरंजीतील कलानगर येथील घरांचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच इचलकरंजी आणि जुना बुधवार पेठेतील प्रशस्त फ्लॅट पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. वर्षअखेरपर्यंत पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरीतील फ्लॅट तयार होणार आहेत.पोलिस मुख्यालयात पोलिस क्लबच्याही बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. यात अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानांची व्यवस्था होणार आहे. कुरुंदवाड आणि शहापूर पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारती तयार झाल्या आहेत. येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत त्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. कागल आणि कळे पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारतींना मंजुरी मिळाली असून, नव्या वर्षात बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.१८५ कोटींचा खर्चपोलिसांच्या घरांसाठी १८५ कोटी ८७ लाखांचा खर्च केला जात आहे. जुना बुधवार पेठेतील घरांसाठी ३७ कोटी २४ लाख रुपये, पोलिस मुख्यालयातील घरांसाठी ७१ कोटी २८ लाख, लक्ष्मीपुरीतील घरांसाठी ३४ कोटी ६२ लाख, तर इचलकरंजीतील घरांसाठी ४२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

प्रशस्त घरांचे स्वप्न साकारअनेक वर्षे जुन्या आणि अडगळीच्या घरांमध्ये काढलेल्या पोलिसांना किमान ५३८ स्क्वेअर फुटांचे घर मिळणार आहे. इमारतींमध्ये हवेशीर फ्लॅट, प्रशस्त कॉमन एरिया, पार्किंग, मुलांसाठी खेळाचे मैदान अशा सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे पोलिस कुटुंबीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न नवीन वर्षात साकार होणार आहे.

६७८ फ्लॅट्सची निर्मितीजुना बुधवार पेठ - १६८पोलिस मुख्यालय - २०४लक्ष्मीपुरी - ९६इचलकरंजी (कलानगर) - २१०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजन