शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

पोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणी कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 7:38 PM

Dam Kolhapurnews- कोणताही गाजावाजा न करता आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २१ वर्षांनंतर पोलिस बंदोबस्तात धरणाच्या घळभरणीस सुरुवात झाली आहे. जुनला पाणीसाठ्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणी कामास सुरुवात जूनला पाणीसाठ्याचे नियोजन : विरोध नसला तर दोन महिन्यात काम पूर्ण

रवींद्र येसादे

उत्तूर : कोणताही गाजावाजा न करता आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २१ वर्षांनंतर पोलिस बंदोबस्तात धरणाच्या घळभरणीस सुरुवात झाली आहे. जुनला पाणीसाठ्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.३० कोटींचा प्रकल्प सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह तो ४५७ कोटींवर पोहोचला आहे. फक्त १० % टक्केच काम शिल्लक आहे.१.२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा असणाऱ्या प्रकल्पात आजरा तालुक्यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २२७ कोटी ५४ लाख रुपयांत स्वेच्छा पुर्नवसन, गावठाण वसाहतींचे प्रश्न, नागरी सुविधा, जमिनींचे वाटप आदी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.कोल्हापूर पद्धतीचे बंधाराऱ्यांचे कामास प्रकल्पात पाणी साठा होणार असल्याने त्याचे ही काम गतीने सुरू झाले आहे.

०.५० मे. वॅट वीजनिर्मितीचे उदिष्ट असून त्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाचे डावे - उजवे तिरावरील काम पुर्णत्वाकडे आले आहे. पिचिंगचे १९ हजार स्वे. मीटर काम झाले अजून ४० हजार स्वे. मीटर काम बाकी आहे. घळभरणी साठी २ लाख ३६ घनमीटर मात काम होणार आहे.

जूनला कोणत्याही परिस्थितीत पाणी साठा होणार असल्याने पाटबंधारे विभागाने कामाची गती वाढवली आहे .एप्रिलअखेर हे काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जूनला पाणी साठा होणार आहे.- के.एस बारदेस्कर.प्रकल्पशाखा अभियंता

गरजेनुसार पोलिस बंदोबस्त प्रकल्पाच्या कामात प्रकल्पग्रस्तांची आडकाठी नको म्हणून गरजेनुसार घळभरणीचे काम पुर्ण होईपर्यंत पोलिस बंदोबस्त राहणार आहे. प्रकल्प स्थळ सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भ्रगे, पोलिस निरीक्षक युवराज जाधव यांचे सह २५ पोलिस तैनात केले. 

आधी पुर्नवसन मगच् घळभरणी असा कायदा असताना नियम मोडित काढून नेते मंडळी श्रेय घेण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले आहे. धरण ग्रस्तांवर खोटे खटले घालून आंदोलकांवर पोलिस कारवाई केली जाते. हे योग्य नाही. कायदा धाब्यावर बसवून काम सुरू आहे.शंकर पावले,धरणग्रस्त आर्दाळ 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर