कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त, ‘पद्मावत’ दहा चित्रपटगृहांत प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 19:10 IST2018-01-24T19:07:27+5:302018-01-24T19:10:29+5:30

‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे दहा चित्रपटगृहांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या वेशातही परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, यासाठी कोल्हापुरात हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी शिवाजी चौकात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Police settlement outside the theaters, in Kolhapur district and displayed in ten theaters of 'Padmavat' | कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त, ‘पद्मावत’ दहा चित्रपटगृहांत प्रदर्शित

कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त, ‘पद्मावत’ दहा चित्रपटगृहांत प्रदर्शित

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त ‘पद्मावत’ जिल्ह्यात दहा चित्रपटगृहांत प्रदर्शित

कोल्हापूर : ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे दहा चित्रपटगृहांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या वेशातही परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत आहेत.

‘पद्मावत’ हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, यासाठी कोल्हापुरात हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी शिवाजी चौकात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बुधवारी दिवसभरात सिनेमागृहांबाहेर पोलीस बंदोबस्त असल्याने निदर्शने झाली नाहीत.  गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने विशेष खबरदारी घेतली असल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

 

Web Title: Police settlement outside the theaters, in Kolhapur district and displayed in ten theaters of 'Padmavat'