शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Live: मतदान सुरू होताच जळगाव येथे गोंधळ; गणेश नाईकांना केंद्र सापडेना
2
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
4
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
5
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
6
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
7
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
8
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
9
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
10
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
11
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
12
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
13
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
14
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
15
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
16
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
17
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
18
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
19
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
20
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:31 IST

Maratha Reservation : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर ठेवली होती. त्याशिवाय परिसरातील उंच इमारतींवर टेहाळणी करण्यासाठी पोलीस तैनात केले होते.

ठळक मुद्दे आंदोलन स्थळाकडे येणारी वाहतुक रोखली दीड हजारावर पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मूक आंदोलनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरात भर पावसातही पोलिसांचा खडा बंदोबस्त राहिला. शहरात नाकाबंदी, ड्रोनद्वारे नजरया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर ठेवली होती. त्याशिवाय परिसरातील उंच इमारतींवर टेहाळणी करण्यासाठी पोलीस तैनात केले होते.

या आंदोलनाला होणारी गर्दी विचारात घेता, समाधीस्थळाकडे जाणारे सर्व वाहतुकीचे मार्ग पोलिसांनी रोखून धरले होते. मुसळधार पाऊस पडत असतानाही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. मराठा समाज आरक्षण मागणीसाठी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाचे आयोजन केले होते. पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात केल्याने त्यातच कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाला होणारी गर्दी पाहता, आंदोलनस्थळाकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी रोखून धरले होते.

शहरात वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतूक शहराबाहेरच रोखून ती परस्पर पर्यायी मार्गाने पुढे वळवली होती. याशिवाय शहरातील दसरा चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोडवर जुनी मराठा बँक, सोन्या मारुती चौक, शिवाजी पूल याठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी अडवले होते.

याशिवाय दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील शंभर फुटी रोड, व्हीनस कॉर्नर परिसरातील गाडी अड्डा, चित्रदुर्ग मठ, महालक्ष्मी जीमखाना तसेच राजाराम रोडवर आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यामुळे हा परिसर वाहनांच्या पार्किंगने फुल्ल झाला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, अनिल गुजर, श्रीकृष्ण कटकधोंड, सीताराम डुबल हे अधिकारी आंदोलन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवून होते. याशिवाय सुमारे दीड हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर