शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कळेत तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, ८ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:12 IST

येथील भरवस्तीत सुरु असणा-या तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकुन ८ जणांना ताब्यात घेतले तर ३ जण पळुन गेले.  रोकड ५४०० जप्त केली. पळुन जाणा-यात एका प्राथमिक शिक्षकाचा तर एका सहा. फौजदार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पोलिस कर्मचा-याचाही समावेश आहे.

ठळक मुद्देकळेत तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा८ जण ताब्यात, तिघे पळुन जाण्यात यशस्वी

कळे (ता. पन्हाळा ) - येथील भरवस्तीत सुरु असणा-या तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकुन ८ जणांना ताब्यात घेतले तर ३ जण पळुन गेले.  रोकड ५४०० जप्त केली. पळुन जाणा-यात एका प्राथमिक शिक्षकाचा तर एका सहा. फौजदार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पोलिस कर्मचा-याचाही समावेश आहे.कळे ( ता. पन्हाळा ) येथील चर्मकार वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरील भर वस्तीत राजाराम उर्फ दुजा दादु पोवार यांच्या जुन्या घरातील माडीवर तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती कळे पोलिसांना मिळाली. त्यानुसार कळे पोलिसांनी घटनास्थळी साध्या वेषात दुचाकीवरुन जाऊन दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई केली.राजाराम उर्फ दुजा दादु पोवार ( वय-४६) , कुमार बाबुराव कासार( वय-६५) , प्रकाश पांडुरंग माळवे( वय-४०), मोहन पांडुरंग शिरसाट( वय-४५), शिवाजी धोंडीराम कुरणे(वय- ५०), सर्जेराव पांडुरंग सुतार ( वय-४७), सागर बाबुराव दंताळ(वय-४०), सखाराम सदाशिव इंजुळकर( वय-५५) सर्व रा. कळे ( ता. पन्हाळा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत.

कळे येथील जुगार अड्ड्याच्या परिसरातच राहणारा एक प्राथमिक शिक्षक, कळे पोलीस ठाण्यातुनच सहा. फौजदार या पदावरुन सेवानिवृत्त झालेले पोलीस कर्मचारी सर्जेराव पाटील (वय-६० रा. खाटांगळे, ता.करवीर ) व बाबासो शिवाजी पोवार ( रा. कळे) हे घटनास्थळावरुन पसार झाले.अधिक तपास सहा. पो. निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार रंगराव सौंदडे, पोलीस कॉन्स्टेबल बळवंत पाटील आदी करत आहेत.जुगाराचा अड्डा गेली २५ वर्षे सुरु कळे येथील हा जुगाराचा अड्डा गेली २५ वर्षे या ठिकाणी भर वस्तीत सुरु होता. शेजारच्या नागरीकांना याचा खुप त्रास होत होता. पण कोणीही तक्रार करत नव्हतं. कळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. तथापि हा अड्डा कायमचा बंद करावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.पोलिसांची कसोटीसुमारे दोन वर्षापुर्वीही कळे पोलिसांकडुन या जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आला होता. परंतु कळे पोलिसांनी त्यावेळी केवळ समज देऊन सोडुन दिले होते. या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात केलेल्या कारवाईत तरी कळे पोलीस या संशयीतांच्यावर योग्य कारवाई करणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागुन राहीले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर