शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दोघांच्या इमारतीवरून उड्या; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 11:35 IST

दगडावर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीच्या दूसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याचे समजल्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहील मायकेल मिणेकर (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.राजेंद्र नगर येथील एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस अकरा वाजण्याच्या सुमाराला तेथे पोहोचले असता कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय यांनी उड्या मारल्या. इमारती खाली असलेल्या दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला.

शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला. तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सीपीआरच्या आवारात गर्दीसाहिलचा मृत्यू झाल्याचे कळताच राजेंद्रनगर येथील तरुणांनी आणि नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांनी येथे हंबरडा फोडला.

पोलिस बंदोबस्तगर्दी वाढल्याने सीपीआरच्या शवविच्छेदन विभागाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीश गुरव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू