शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

Kolhapur: पोलिस नाईक चेतन घाटगे अटकेत, जबाब घेताना केला होता अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:45 IST

बक्कल नंबर ४२०

कोल्हापूर : लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेताना तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक चेतन दिलीप घाटगे (वय ३९, मूळ रा. नेज, ता. हातकणंगले, सध्या रा. इंगळेनगर, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) सकाळी आजरा येथून अटक केली. गुरुवारी (दि. ३) रात्री गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यातील पीडित मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस नाईक घाटगे हा बुधवारी रात्री खासगी रुग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला स्वत:चा मोबाइल नंबर दिला.भिऊ नको. तू माझी मैत्रीण आहेस. काही अडचण आली तर मला फोन कर, असे म्हणत त्याने मुलीच्या अंगाला स्पर्श केला. याबाबत पीडित मुलीने फिर्याद देताच तो पळून गेला होता. गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याचे निलंबन केले. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.बक्कल नंबर ४२०राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा घाटगे याच्यावर यापूर्वी दाखल झाला होता. त्या वेळी त्याचे निलंबन झाले होते. त्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर त्याला सेवेत घेतले होते. आता पुन्हा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्याचा बक्कल नंबर ४२० असा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस