तुम्ही घसरू नये म्हणून पोलिसच आले मदतीला धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:50 IST2019-03-13T00:49:15+5:302019-03-13T00:50:22+5:30
धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले.

कोल्हापुरात धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावरील रस्त्यावर मंगळवारी सकाळी टॅँकरमधून आॅईल गळती झाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी या रस्त्यावर पडलेल्या आॅईलवर माती पसरून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.
कोल्हापूर : धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले.
आॅइलच्या गळतीने रस्ता निसरडा झाल्याने पाठीमागून येणाऱ्या २० हून अधिक दुचाकीस्वारांना दुचाकीवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यात १५ जण जखमी झाले. ही बाब पोलीस कवायत मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंना समजली. त्यांनी अग्निशमन दलास याची माहिती दिली.
पोलीस कर्मचारी इजाज शेख, संदीप जाधव, मोहन गवळी, सतीश माने, अभिजित कुरणे, धनंजय परब यांनी अलंकार हॉल ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या आॅईलवर माती पसरून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. त्यानंतर शहर वाहतूक शाखा व अग्निशमन दलाने धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर गळती झालेल्या आॅईलवर माती टाकून हा संपूर्ण रस्ता वाहतुकीस खुला केला.
मुख्यालयाकडील पोलीस कर्मचारी सतीश माने हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी धावत येऊन या मार्गावरील सर्व वाहतूक दुसºया बाजूने वळविली.