शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पूर: जलप्रलय पाहणाऱ्या हौशींना पोलिसांकडून चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:24 IST

Kolhapur Flood: महापुराचा धोका वाढत असल्याने जिल्हा पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुल आणि राष्ट्रीय महामार्गावर पूर पाहण्यासाठी आलेल्या हौशींना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. जवाहरनगर परिसरातील रेणुका मंदिर परिसरातही काही तरुण पाण्यात पोहत होते. दिवसभरात शंभराहून अधिक हौशींना पोलिसांना हटकले. पुन्हा पुराच्या पाण्याच्या गेल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. पूरस्थितीत राष्ट्रीय महामार्गासह पूरग्रस्त असलेल्या भागात पोलिसांचा रात्रदिवस पहारा सुरु आहे. जिल्ह्यात १ हजार पोलिसांसह १२०० होमगार्ड तैनात केले असून पोलिस प्रशासन २४ तास दक्ष आहे.   

महापुराचा धोका वाढत असल्याने जिल्हा पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखेचे शशिराज पाटोळे यांच्यासह जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यातील कर्मचारी पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.  पाण्याखाली गेलेले बंधारे, पूल आणि रस्त्यांवर दुर्घटना घडू नयेत, यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक दहा मिनिटाला प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूरस्थितीचा आढावा वरिष्ठाकडून घेतला जात आहे. ही स्थिती गंभीर असल्यास जादा पोलिस मदतकार्यासाठी पाठविले जात आहेत. मंगळवारी काही हौशींनी पुराचे पाणी पाहण्यासाठी रत्नागिरी रोडवरील शिवाजी पूल, राष्ट्रीय महामार्गावरील पूल, कळंबा तलाव, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी, दुधाळी परिसरात गर्दी केली. काही तरुण पुराच्या पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत होते. तर पाण्यात उभे राहून सेल्फी काढत होते. या तरुणांना पोलिसांनी हटकले. हायवेवरील पुलावरही गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी या ठिकाणाहून तरुणांना पांगविले.    

दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीला शीघ्रकृती दलाचे एक पथक तैनात केले आहे. याशिवाय १२०० होमगार्डही जिल्ह्यात विविध ठिकाणी तैनात केले आहेत. शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी यासह कदमवाडी, जाधववाडी , बापट कॅम्प येथील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी शीघ्र कृती दलाचे जवानांनी मदत केली. पोलिसांच्या मदतीसाठी १२०० होमगार्ड रवाना झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरfloodपूरRainपाऊस