शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

लाचप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अटकेत, दहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 5:07 PM

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकाकडे दहा हजार रुपये लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने ...

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकाकडे दहा हजार रुपये लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (३५, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याला सोमवारी (दि. १७) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी केली. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली, त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारून आणखी दहा हजारांची लाचेची मागणी केली होती.अधिक माहिती अशी की, नागाळा पार्कमधील बांधकाम व्यावसायिक धीरज अनिल साखळकर (३७, रा. एव्हरग्रीन होम, नागाळा पार्क) यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने याने त्यांना गुन्ह्याच्या कामात मदत करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच त्याने तपास अधिकारी यांच्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतली. आणखी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाच्या पडताळणीमध्ये कॉन्स्टेबल मर्दाने याने तपास अधिकाऱ्यांसाठी २५ हजारांची लाच स्वीकारल्याचे मान्य करून तसेच दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने यांना अटक केली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, मयूर देसाई, संदीप पडवळ, रूपेश माने आदींनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी