पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:02+5:302021-06-29T04:18:02+5:30

अनिल पाटील सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे गावकामगार पोलीस ...

Police are waiting for Patil's honorarium | पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत

पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत

अनिल पाटील

सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क

गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे गावकामगार पोलीस पाटील हे गेल्या तीन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. जून महिना संपत आला तरी मार्च, एप्रिल व मे अशा तीन महिन्यांचे मानधन पोलीस पाटलांना अध्यापही मिळालेले नाही.

गावपातळीवरील कायदा आणि सुव्यवस्थेथेच्या दृष्टीने पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे. पोलीस प्रशासनाच्या कामात पोलीस पाटलांना अनेक महत्त्वाची कामे व जबाबदाऱ्या पूर्ण वेळ देऊन पार पाडव्या लागतात. सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या साथीमध्ये गावागावांतील प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याबरोबरच पोलीस पाटीलही गावागावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या कामात आघाडीवर आहेत. प्रत्येक गावातील पोलीस पाटील हा त्या गावातील स्थानिक कोरोना समितीचा सचिव म्हणून आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहे. असे असताना याच पोलीस पाटलांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून पोलीस पाटलांना शासनाकडून मानधन मिळालेले नाही. यापूर्वीही अनेक वेळा पोलीस पाटलांना मानधनासाठी चार-चार महिने प्रतीक्षा करावी लागली आहे. वेळेत मानधन मिळत नसल्यामुळे काही वेळा पोलीस पाटलांना शासनाच्या कामासाठी पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने पोलीस पाटलांना प्रलंबित असणारे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी पोलीस पाटलांच्यातून होत आहे.

Web Title: Police are waiting for Patil's honorarium