शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

लाच स्वीकारणारे पोलीस आता कायमचे जाणार घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 05:54 IST

पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे.

- एकनाथ पाटील कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड कमी होणार आहे. सध्या कोल्हापूर पोलीस दलामध्ये वर्षभरात २० पोलीस निलंबित आहेत.मुंबई पोलीस दलामध्ये भ्रष्टाचार वाढल्याने पोलीस कमिशनर सुबोधकुमार जायस्वाल यांनी लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित नाही तर थेट नोकरीवरून काढून टाकण्याचे आदेश काढले आहेत. हा निर्णय पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना यापुढे हा आदेश लागू होणार असल्याने भ्रष्ट अधिकाºयांच्या झोपा उडाल्या आहेत.महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्टेशन, आदी प्रशासकीय कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाºया अधिकारी व कर्मचाºयांमध्ये पोलीस दल ‘नंबर वन’ आहे. त्यामुळे ‘खा’की अशी ओळख पोलीस खात्याची झाली आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाºया गुन्ह्यांतील आरोपीसह फिर्यादीकडून तपास अधिकारी किंवा कर्मचारी वरकमाई मिळविण्याचा प्रयत्न करतात. पैशांच्या भुकेने पछाडलेला काही वर्ग आजही पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. लाच स्वीकारल्यानंतर अटक होऊन दोन दिवसांनी अहवाल मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित केले जाते. पुन्हा सहा महिन्यांनंतर ते पोलीस खात्यात नियमित रूजू होतात.पोलीस दलामध्ये लाच घेणाºयांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पोलीस दलाची पुरती नाचक्की होते. एकीकडे सरकार स्वच्छ आणि इमानदार प्रतिमा असल्याचा दावा करत आहे; परंतु दुसरीकडे पोलीस दलामध्ये भ्रष्टाचार वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारचा दावा खोटा ठरत आहे. यापुढे लाच घेणाºया अधिकारी, कर्मचाºयाला थेट ‘घरचा रस्ता’ दाखविला जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील बहुतांशी अधिकारी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.>यासाठी घेतली जाते लाच...आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणेप्रतिबंधक कारवाई न करणे, अटक न करणे‘एम केस’चा तपास फिर्यादीच्या बाजूने करणेतक्रारदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई न करणेमुद्देमाल परत देणेन्यायालयाने बजावलेले समन्स न देणेगंभीर गुन्ह्यात अटक टाळणेगंभीर कलम कमी करण्यासाठी>आमिषाला बळी पडू नकापोलीस ठाण्यात येणाºया नागरिकांशी कसे बोलले जाते. कोणाशी मोबाईल किंवा समोरासमोर बोलताना कशाप्रकारे व्यवहार केला जातो. त्यावर पोलिसांची एक विशेष यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडायचे नाही, अशा सूचनाही वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत.>लाचखोर पोलीस अधिकारी किंवा कर्मचाºयांना पोलीस दलामध्ये पुन्हा रूजू होण्याचा अधिकार नाही. त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळते. न्यायालयात जाऊन पुन्हा रूजू होण्याच्या मार्गावर प्रयत्न करत असले तरी त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया आमच्याकडून सुरू असते.- डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक