शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:52 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे पिक विमा करण्यात अडथळे आल्याने व विमा मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांही शेतकरी बांधवानी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी लावून धरली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणीकोरोनाच्या भितीने पिक विमा नोंदणीत अडथळे

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे पिक विमा करण्यात अडथळे आल्याने व विमा मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांही शेतकरी बांधवानी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी लावून धरली आहे.

एकिकडे पावसाने पाठ फिरवल्याने हातची पिके गेल्याचे चित्र सद्या दिसते आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव व सततचे लॉकडाऊन यामुळे घराबाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे.दुष्काळ, पावसातील खंड, पूर यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विमा कंपनी अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना विमा कवच देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी पिक लागणीनंतर ठराविक मुदतीत पिक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येते. यासाठी शासन व कृषी विभागाकडुन प्रबोधन करण्यात येते .या वर्षीही रिलायन्स जनरल विमा कंपनीच्या सहकार्याने ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याची मुदत काल संपली. पण यावर्षी पावसाची अनियमितता प्रचंड वाढली आहे, गतसालच्या तुलनेत पाऊसही कमीच झाला. त्यामुळे पेरणी केलेली बहुतांशी पिके पावसाअभावी शेतातच वाळली.

दुष्काळ सदृश्य परस्थिती असताना शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची गरज वाटते आहे. पण कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता आले नाही . व त्यातच ही विमा मुदत संपली. ही मुदत वाढवुन मिळावी ही मागणी जोर धरत आहे.

यावर्षी  २०८३ शेतकऱ्यांचा पिक विमा 

गतसाली ६८२ शेतकऱ्यांनी २९६ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील भात, भुईमूग नाचणी इ. पिकाचा विमा उतरवला होता. पैकी ५८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती, तर यावर्षी  २०८३ शेतकऱ्यांनी ४७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला असे चित्र आहे.

गतसालच्या तुलनेत पिक विमा नोंदीचा आकडा जरी वाढला असला तरी पिक विमा नोंदणीसाठी दिलेली मुदत कमी आहे. मुदत वाढवून मिळाल्यास अजुनही जवळपास १५० हेक्टर क्षेत्राची वाढ होऊ शकते.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर