शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिरात प्लास्टिक बंदी

By admin | Updated: October 7, 2015 00:51 IST

जिल्हा प्रशासनाचा निर्णय : देवस्थानतर्फे प्रसाद वाटप होणार

कोल्हापूर : नवरात्रौत्सवादरम्यान अंबाबाई मंदिरात प्लास्टिकमुक्त उत्सव साजरा व्हावा यासाठी या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाचे नियोजन आणि सुरक्षेबाबत आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी हा निर्णय जाहीर केला. याशिवाय मंदिराच्या सुरक्षेसंबंधी सूचना केल्या. दरम्यान, प्रथमच यावर्षी देवस्थान तर्फे प्रसाद वाटप होणार आहे.नवरात्रौत्सवादरम्यान अंबाबाई मंदिरात राज्यासह आसपासच्या राज्यांमधून दहा ते बारा लाख भाविक दशर्नासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर बैठकीत मंदिराच्या आतील आणि बाहेरील सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिल्या आहेत. सीसीटीव्ही सुस्थितीत बसवणे, बॅरिकेट्स वाढवणे, दर्शनरांगेवरील मंडप वाढविणे आणि महिला भाविकांची संख्या अधिक असल्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांसह महिला पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी मंदिर परिसरात पुरेसा प्रकाश असावा यासाठी हायमॅक्स दिव्यांची डागडुजी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंगची सुविधा, दर्शनरांगांचे नियोजन करण्याबरोबरच अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्कालीन यंत्रणेलाही दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. मंदिरात उत्सवादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे प्लास्टिकमुक्त उत्सवाचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ओटीचे साहित्य, प्रसाद आणि पूजेचे इतर साहित्य प्लास्टिक पिशव्यांमधून विकले जाऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. नवरात्रौत्सवादरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी परवानगी घेऊनच मंडप उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचदरम्यान मोहरम असल्याने या दोन्ही सणांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे आणि शांततेत सण-उत्सव पार पडावेत यासाठी सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, एस. एस. साळवी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आज गाभारा बंदअंबाबाई मंदिराचा गाभारा आज, बुधवारी स्वच्छ करण्यात येणार आहे. देवीच्या मूळ मूर्तीवर इरलं पांघरून गाभारा स्वच्छ केला जाईल. त्यामुळे मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. संध्याकाळी ७ नंतर मूर्ती पूर्ववत दर्शनासाठी खुली होईल.