शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

ट्रेनिंगवर लक्ष दिल्यास प्लेसमेंट आपोआप मिळते -संजय अकिवाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:25 IST

अकिवाटे हे गेली ३३ वर्षे डीकेटीईमध्ये काम करतात. त्यामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंटचा त्यांचा २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसंदर्भातील माहिती मिळण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा फायदा : विभाग सक्षम हवा --चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद-ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट आॅफिसर, डीकेटीई

अतुल आंबी ।सर्वच महाविद्यालयांमध्ये ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट असा विभाग कार्यरत असतो. मात्र, बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केले जाते. तो भाग फक्त कागदावरच असतो आणि प्लेसमेंटवर लक्ष केंद्रीत केले जाते. मात्र, ट्रेनिंगवर काळजीपूर्वक लक्ष देऊन काम केल्यास प्लेसमेंट आपोआप मिळते. हे डीकेटीईच्या प्लेसमेंट यशाचे नेमके गमक आहे, अशी माहिती देणारे प्रा. संजय अकिवाटे हे गेली ३३ वर्षे डीकेटीईमध्ये काम करतात. त्यामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंटचा त्यांचा २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसंदर्भातील माहिती मिळण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : प्लेसमेंटमध्ये डीकेटीईचे नाव अग्रेसर असण्याचे नेमके रहस्य काय?उत्तर : डीकेटीईमध्ये टेक्स्टाईल विभागातील सर्वच जवळपास ८०० विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी विविध ठिकाणी पाठविले जाते. त्यामध्ये कोईमतूर ते जम्मू व भुज-गुजरात ते कोलकत्ता अशा सर्वच ठिकाणच्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना माहितीसाठी पाठविले जाते. तसेच इच्छुक असणाºया २५ ते ३० जणांना परदेशातील इंटरनॅशनल कंपन्यांमध्येही ट्रेनिंगसाठी पाठविले जाते. त्याचा सखोल अहवाल त्यांना करावा लागतो. उन्हाळी सुटीत हे करवून घेतले जाते. त्यावर आम्ही स्वत: लक्ष ठेवतो. त्यामुळे प्रत्यक्षात घेतलेल्या अनुभवातून शिक्षण मिळाल्याने प्लेसमेंटसाठी आलेल्या कंपन्या मुलांना तत्काळ निवडतात. नेमके हेच गमक ओळखून डीकेटीईने विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रश्न : किती कंपन्यांबरोबर आपला करार आहे?उत्तर : डीकेटीईचा जवळपास ३५० कंपन्यांबरोबर प्लेसमेंटसाठीचा करार आहे. दरवर्षी किमान १५० कंपन्यांबरोबर संपर्क होतो. त्यातील महत्त्वाच्या असलेल्या ६० कंपन्यांना आम्ही बोलवतो. त्यामध्ये त्यांना आवश्यक गुणवत्तेनुसार ते विद्यार्थ्यांची निवड करतात. जगातील टॉप ५ कंपन्याही प्लेसमेंटसाठी येतात. अनेकवेळा ट्रेनिंगसाठी गेलेल्या ठिकाणीही विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अशा २५ ते ३० जणांना दरवर्षी प्री प्लेसमेंट आॅफरही मिळते.

प्रश्न : वर्षाला किती विद्यार्थ्यांची निवड होते?उत्तर : प्लेसमेंटसाठी जवळपास २२० विद्यार्थी इच्छुक असतात. विशेष म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे सर्वच विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट इंटिग्रेटेड टेक्स्टाईल कंपनी, टेली टॉवेल, शिटींग, टेक्निकल टेक्स्टाईल, डायपर अशी उत्पादने असणाºया कंपन्यांमध्ये निवड होते.विशेष प्रशिक्षणआजकालच्या युगात मुद्देसुद बोलणे, आपले ज्ञान परिपक्वपणे मांडणे, याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. हे ओळखून आम्ही डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास शिबिर (कम्युनिकेशन अ‍ॅण्ड सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट) या माध्यमातून विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे प्लेसमेंटसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना डीकेटीईमधील विद्यार्थ्यांची मुलाखत प्रभावी ठरते 

विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे महाविद्यालयांचे कर्तव्यच आहे. मात्र, पुढे त्यांचे जीवन सुखमय व्हावे. त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी, यासाठी प्लेसमेंटद्वारे संधी मिळवून देण्यात डीकेटीई नेहमी अग्रेसर असते. - संजय अकिवाटे, 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षण