शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Kolhapur: सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलर पूल; मंत्री गडकरी यांच्याकडून ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 12:59 IST

शंभर पिलरवर उड्डाणपूल

सतीश पाटीलशिरोली : सहापदरीकरणामध्ये शिरोली येथील सांगली फाटा ते उचगावदरम्यान सुमारे तीन किलोमीटरपर्यंतच्या पिलरचा उड्डाणपूल करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोवा येथील हाॅटेल ताज येथे झालेल्या आढावा बैठकीत ग्रीन सिग्नल दिला आहे. या उड्डाणपुलासाठी अंदाजे ६०० कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या १३३ किलोमीटर अंतरातील सहापदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सहापदरीकरणाचे काम करत असताना शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावर पावसाळ्यात महामार्गावर पाणी येऊन सन २०१९ ला आठ दिवस, तर २०२१ ला चार दिवस महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती.सध्या महामार्गाचे काम करत असताना या भागात ११ मोहऱ्या (छोटे बोगदे) पाणी जाण्यासाठी मंजूर केल्या होत्या. तसेच १० फुटाने महामार्गाची उंची वाढणार होती. यामुळे भविष्यात पाऊस पडला की पंचगंगा नदीवर बंधारा तयार होऊन पाण्याची फुगी वाढून नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका होता. तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार होते.म्हणून शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलर उड्डाणपूल मंजूर होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवणार, असा इशारा देत पूरग्रस्त समितीने पंचगंगा नदी पुलाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले होते. याबाबत खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, धैर्यशील माने, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील यांच्याकडे स्थानिक लोक, शेतकरी यांची सतत मागणी होती.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांतील सुरू असलेल्या रस्ते कामांबाबत केंद्रीय मंत्री गडकरी आणि रस्ते अधिकारी, ठेकेदार यांची २३ डिसेंबर २०२३ रोजी गोवा येथील ताज हॉटेलमध्ये संयुक्त बैठक पार पडली़ बैठकीत शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावरील पिलर उड्डाणपुलाबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी मंत्री गडकरी यांनी लोकांना त्रास होऊ नये आणि मागणी असेल तर पिलरचा उड्डाणपूल करा आणि याबाबत अभ्यास करून वाढीव प्रस्ताव सादर करा, असे सांगून पिलरच्या उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

शंभर पिलरवर उड्डाणपूलशिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज ३ किलोमीटरचा उड्डाणपूल सुमारे १०० पिलरवर उभारला जाणार आहे.

शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी गोवा येथील बैठकीत मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन सिग्नल दिला असून, त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण माहिती गोळा करून देत आहोत. -वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग