शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्यापासून पोलिस भरती, ८८ जागांसाठी किती उमेदवार आले, नियोजन कसे...वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:22 IST

मॉर्निंग वॉकला परवानगी नाही

कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील रिक्त ८८ जागांसाठी शुक्रवारपासून (दि. १३) शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. पोलिस परेड ग्राऊंड आणि राजाराम कारखाना चौक ते शिये पूल येथे होणाऱ्या शारीरिक चाचणीत सहा हजार ८५३ उमेदवार आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. २१ फेब्रुवारीपर्यंत शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू राहणार असून, बंदोबस्तासाठी ३०० पोलिस मैदानावर तैनात असतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.राज्यात सुमारे १५ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील रिक्त ८८ जागांसाठी शुक्रवारपासून शारीरिक चाचणी सुरू होईल. १३ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रविवार (दि. १५) आणि गुरुवार (१९) शिवजयंती असल्याने प्रक्रिया बंद राहील. उर्वरित सात दिवसांत शारीरिक चाचणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.गर्दी टाळण्यासाठी रोज ७०० ते ११०० उमेदवारांना बोलावले जाणार आहे. सर्व उमेदवारांना त्यांचे वेळापत्रक ऑनलाईन पोहोचले आहे. रोज पहाटे पाच वाजता पोलिस परेड ग्राऊंडवर उमेदवारांना हजेरी लावावी लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ११ टेबलांची व्यवस्था केली आहे. छाती आणि उंचीचे मोजमाप झाल्यानंतर १६००, ८०० मीटर धावण्याची चाचणी होईल. त्यानंतर गोळाफेक आणि १०० मीटर धावण्याची चाचणी होईल.रिक्त असलेल्या ८८ जागांसाठी एकूण सहा हजार ८५३ अर्ज आले आहेत. त्यात पाच हजार सात पुरुष, १६७२ महिला आणि १७४ माजी सैनिक उमेदवारांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांचे फेस रिडिंग घेतले जाईल. व्हिडिओ रेकॉर्डिंगसह रियल टाईम यंत्रणेचा वापर केला जाईल. पोलिस भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार चालत नाहीत, असे आमिष कोणी दाखवत असल्यास तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

असे आहे नियोजनतारीख - उमेदवार

  • १३ - ७००
  • १४ - १०००
  • १६ - ११२६
  • १७ - ११०१
  • १८ - १०८०
  • २० - १००९ (८३५ महिला, १७४ माजी सैनिक)
  • २१ - ८३७ (महिला)

स्टेरॉईड वापरल्यास गुन्हा दाखल होणारशारीरिक चाचणीत काही उमेदवार प्रतिबंधित स्टेरॉईडचा वापर करतात. असे गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. लघुशंकेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचीही कसून तपासणी केली जाईल. स्टेरॉईडचा वापर केल्याचे आढळताच संबंधित उमेदवारांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

मॉर्निंग वॉकला परवानगी नाहीपोलिस परेड ग्राऊंडवर मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. पोलिस भरती प्रक्रियेसाठी १३ ते २१ फेब्रुवारीदरम्यान मॉर्निंग वॉक आणि खेळांसाठी नागरिकांना परेड ग्राऊंडवर प्रवेश दिला जाणार नाही. पहाटे पाचपासून दुपारी बारापर्यंत उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. या काळात पोलिस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती मंदिरापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

असा असेल बंदोबस्त

  • पोलिस अधीक्षक - १
  • अपर पोलिस अधीक्षक - २
  • उपअधीक्षक - ६
  • पोलिस निरीक्षक - १२
  • सपोनि, उपनिरीक्षक - २८
  • अंमलदार - २७०
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Recruitment Starts Tomorrow; Details on Candidates and Planning

Web Summary : Kolhapur police recruitment for 88 posts begins tomorrow with physical tests. Over 6,853 candidates will compete until February 21st. Strict measures are in place to prevent cheating, including face reading and video recording. Steroid use is prohibited, and morning walks are restricted at the parade ground during the recruitment period.