शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: मॉडर्न फॅशनचे कपडे, मेकअप अन् कॅट वॉक कर म्हणत विवाहितेस मारहाण; अनेक वेळा दारुही पाजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:18 IST

मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

गांधीनगर : उचगाव ता. करवीर येथे विवाहितेला घरातील कामावरून घालूनपाडून बोलून मॉडर्न फॅशनचे कपडे व मेकअप कर तसेच माहेरहून गाडीसाठी पैशाचा तगादा लावून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राधिका रोहित पोवार (वय ३१, रा. मेन रोड, उचगांव, ता. करवीर, सध्या रा. साई मंदिराजवळ, कळंबा, कोल्हापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती रोहित तुषार पोवार, सासू भारती तुषार पोवार, सासरे तुषार सीताराम पोवार, नणंद शिवानी तुषार पोवार, पतीचे मामा राजेंद्र पाटील, पतीची मामी कविता राजेंद्र पाटील (रा. मेन रोड उचगांव, ता. करवीर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीत वरील सहा जणांनी कॅट वॉक कर, असे म्हणून फिर्यादीवर जबरदस्ती करून मानसिक व शारीरिक छळ केला. घरातील मिळेल त्या वस्तूने फेकून मारहाण करून, दारू पिवून शिवीगाळ व मारहाण करून जबरदस्तीने पाच ते सहा वेळेला दारू पाजली. माहेरहून चार चाकी गाडीसाठी २० लाख रुपये घेऊन ये तसेच सर्व कपडे व आई, वडिलांनी लग्नामध्ये घातलेले २५ तोळे दागिने काढून घेतले. घरातून बाहेर हाकलून काढले, असे नमूद केले आहे. याबाबत गांधीनगर पोलिसांत नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस नाईक कांबळे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस