अंगावर पेट्रोल टाकून जाळले ; खून झालेल्या युवकाची ओळख पटली; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 17:07 IST2019-03-05T17:02:36+5:302019-03-05T17:07:43+5:30
अंगावर पेट्रोल टाकून पेटवून खून झालेल्या युवकाची अवघ्या दोन तासांत ओळख पटविण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.

अंगावर पेट्रोल टाकून जाळले ; खून झालेल्या युवकाची ओळख पटली; कारण अस्पष्ट
सातारा : अंगावर पेट्रोल टाकून पेटवून खून झालेल्या युवकाची अवघ्या दोन तासांत ओळख पटविण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
मंदार प्रदीप नगरकर (वय ३२, सध्या रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार, मूळ रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सातारा शहरालगत असणाऱ्या पिरवाडी येथे सोमवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत पोलिसांना मृतदेह आढळला.
पेट्रोल टाकून जाळून युवकाचा खून करण्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्यांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी पिरवाडी, खेड, लक्ष्मीटेकडी परिसरात या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संबंधित मृत युवक लक्ष्मीटेकडी येथे वास्तव्यास होता, अशी माहिती समोर आली.
शोभा नगरकर यांनी हा आपला मुलगा मंदार नगरकर असल्याचे ओळखले. मृतदेह पाहून आईने आक्रोश केला. मंदार हा गवंडी काम करत होता. तो एकुलता एक होता. त्याचा खून कोणी व कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नाही.