शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टोप खणीत कचरा टाकण्यास परवानगी; हरित लवादाचा निर्णय

By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत.

कोल्हापूर : टोप येथील खणीत शहरातील कचऱ्यापासून प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले घटक (इनर्ट मटेरिअल) टाकण्यास मंगळवारी पुण्यातील हरित लवादाने महापालिकेला सशर्त परवानगी दिली. कसबा बावडा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यानंतरच टोप येथील खणीचा भूमी भरण केंद्र (लँड फिल्ड साईट) म्हणून महापालिकेला वापर करता येईल, अशी अट न्यायाधीश व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने निकालात नमूद केली. टोप येथील खणीचा ‘भूमी भरण क्षेत्र’ म्हणून उपयोग करण्यास टोपसह परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप येथील जागेची अत्यंत गरज आहे. ग्रामस्थांचे आक्षेप कायद्याला धरून नाहीत तसेच आधारहीन असल्याचे महापालिकेने सप्रमाण लवादास पटवून दिले. अंतिम निकाल देताना लवादाने २२ मे २०१५ रोजी दिलेल्या आदेशास अधीन ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप खण महापालिकेला सशर्त परवानगी देत आहे तसेच टोप ग्रामस्थांची याचिका खारीज केल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. याचिका खारीज केल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. निकालातील मुद्देभूमी भरण केंद्र म्हणून टोप खण मनपाच्या ताब्यातखणी भोवती सहा फूट भिंत उभाराकसबा बावडा येथे कचऱ्यावर कालबद्ध मर्यादित प्रक्रिया प्रकल्प उभाराकचऱ्यापासून खत किंवा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करता येतील.जैव वैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रीय निराकरण आवश्यकप्रदूषण मंडळाच्या निकषांप्रमाणेच इनर्ट मटेरिअल खणीत टाकण्यास मुभाइनर्ट मटेरिअलचे शास्त्रीय पद्धतीने निराकरणया मुद्द्यांआधारे २२ मे २०१५ च्या लवादाच्या निकालास अधिन राहून परवानगीशहरात रोज तयार होणाऱ्या १७० टन कचऱ्याचे निराकरण कसे करायचे, हा मनपा समोर मोठा प्रश्न आहे. लवादाच्या निर्णयामुळे ही कोंडी फुटली. झूम प्रकल्प येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पास गती येईल. शास्त्रीय पद्धतीने टोप व राजारामपुरीतील टाकाळा येथील खणीत टाकून त्याचे निराकरण केले जाईल. - डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिकासर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा टोप खण येथे कचरा टाकण्यावरून महापालिका आणि टोप ग्रामस्थ यांच्यातील उद्भवलेल्या प्रश्नावर लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. मात्र, या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा टोप ग्रामस्थांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.