शिवाजी विद्यापीठाची कामगिरी अभिमानास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:06+5:302021-04-04T04:24:06+5:30

कसबा बावडा : शिवाजी विद्यापीठाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर ‘नॅक’चे ‘ए प्लस प्लस’ मानांकन मिळवले आहे. अभ्यासक्रम, शिक्षण, संशोधन, ...

The performance of Shivaji University is proud | शिवाजी विद्यापीठाची कामगिरी अभिमानास्पद

शिवाजी विद्यापीठाची कामगिरी अभिमानास्पद

कसबा बावडा :

शिवाजी विद्यापीठाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर ‘नॅक’चे ‘ए प्लस प्लस’ मानांकन मिळवले आहे. अभ्यासक्रम, शिक्षण, संशोधन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत विद्यापीठाने गरुडझेप घेतली असून ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती व शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले.

डॉ. संजय डी. पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेत विद्यापीठाने ‘नॅक’ मानांकनात घेतलेल्या गरुडभरारीबद्दल अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाची भविष्यकालीन योजना, प्रगती यावर सविस्तर चर्चा झाली. विद्यापीठाच्या भविष्यकालीन विस्तार व अन्य बाबींसाठी शासन पातळीवरून आवश्यक असलेला निधी व अन्य मदतीसाठी आपला नेहमीच पुढाकार राहील, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नंदिवडेकर, आयक्यूएसी सेलचे प्रमुख डॉ. आर.के. कामत, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय जाधव उपस्थित होते.

फोटो : ०३ विद्यापीठ भेट

ओळी: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, आयक्यूएसी सेलचे प्रमुख डॉ. आर.के. कामत आदी उपस्थित होते.

Web Title: The performance of Shivaji University is proud