शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे मान्यता प्राप्त एजन्सीकडून फायर तसेच इलेक्ट्रीकल ऑडिट करा, त्यासाठीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे मान्यता प्राप्त एजन्सीकडून फायर तसेच इलेक्ट्रीकल ऑडिट करा, त्यासाठीचा खर्च आपत्ती व्यवस्थापनमधून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सांगितले.

सीपीआर व भंडारा येथील शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी उद्भवलेल्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज आणि आयजीएम रुग्णालय इचलकरंजी या तीनही ठिकाणच्या अग्नी सुरक्षा तसेच विद्युत सुरक्षेच्या अनुषंगाने समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात झाली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करून घ्यावेत. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करावे व रंगीत तालीम घ्यावी. शासकीय रुग्णालयात बसविण्यात येणाऱ्या यंत्र सामग्रीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करून द्यावे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची मागणी राज्य शासनाकडे करू, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुश कावळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ. व्ही. बी. बर्गे उपस्थित होते.

--