महिलांचा टक्का वाढला
By Admin | Updated: July 10, 2014 23:59 IST2014-07-10T23:58:35+5:302014-07-10T23:59:07+5:30
कोल्हापूर जिल्हा : लोकसंख्येत वाढ; दर हजारी पुरुषामागे ८६३ मुली

महिलांचा टक्का वाढला
संतोष पाटील ल्ल कोल्हापूर
गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाख २३ हजार १६२ वरून ३८ लाख ७६ हजारांवर गेली आहे. २००१च्या जनगणनेच्या तुलनेत कोल्हापुरात १०.०१ टक्के लोक संख्या वाढली आहे. १९९१ जनगणनेनुसार १७.८५ टक्केलोकसंख्या वाढीचा दर होता तो तब्बल सात टक्क्यांनी कमी करण्यात कोल्हापूरला यश आले आहे. मागील दहा वर्षांची तुलना करता दर हजारी मुलींचे प्रमाणात किंचित वाढ होऊन ८३९ वरून ८६३ पर्यंत गेल्याचे समाधान आहे. मात्र, पुरोगामी म्हणविणाऱ्या कोल्हापूर शहरात तब्बल दहा टक्केमहिला पुरुषांच्या तुलनेत अशिक्षित आहेत.
ऐतिहासिक वारसा लाभलेलं रांगड कोल्हापूरच वातावरण नेहमीच महानगरांत राहणाऱ्या लोकांना भुरळ घालत आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा अन् छत्रपती महाराणी ताराराणीच्या शौर्यांच्या गाथा यामुळे कोल्हापूरकरांबद्दल संपूर्ण देशात कमालीची उत्सुकता आहे. येथील बारमाही अल्हादायक व हवेहवेसे वाटणारे सर्व ऋतंूतील वातावरणाच्या सोबतीला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. पुरोगामी विचारांची कास धरत अवघ्या देशाला दिशा देणारे, कोल्हापूरची वैचारिक व सामाजिक वातावरणात आयुष्याची सायंकाळ घालविण्यासाठी अनेकांनी कोल्हापुरात कायमचे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरच्या लोकसंख्या वाढीमध्ये स्थलांतरित लोकांचे कायमचे वास्तव्य हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोल्हापुरातील एकूण लोकसंख्येपैकी १२,३०,००९ लोक शहरी भागात राहतात. एकूण लोकसंख्येच्या ३१.७३ टक्के शहरीकरणाचे प्रमाण आहे. ग्रामीण भागात ६८.२७ टक्के लोक राहतात. ही एकूण लोकसंख्येपैकी २६,४५,९९२ इतकी संख्या आहे. शहरी भागात शिक्षित लोकांचे प्रमाण ८८.२८ टक्के(९,७१,९७६) (पुरुष ९२.४२, तर महिलांचे प्रमाण ८३.९५ टक्के) आहे. ग्रामीण भागात ७८.३५ टक्के (यामध्ये पुरुषांचे प्रमाण ८६.७५, तर महिला ६९.७३ टक्केसाक्षर आहेत.) जिल्ह्यात एकूण शिक्षित लोकसंख्या २८,२५,८४५ इतकी आहे. यामध्ये पुरुष १५,५९,७६०, तर महिलांची संख्या १२,६६,०८५ इतकी आहे.