मोदींच्या कार्यपध्दतीवर जनतेचा विश्वास : चंद्रकांतदादा पाटीलविविध राज्याच्या निवडणुकामध्ये भाजपला मिळालेले अभुतपूर्व यश म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीवर जनतेने दाखविलेला विश्वास होय असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातकांतदादा पाटील यांनी केले.जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे शिवाजी चौकात पक्षातर्फे जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, उत्तरप्रदेशमध्ये आमचीच सत्ता येण्याची खात्री होती, पण तेथे अपेक्षेपेक्षा जादा यश मिळाले आहे. नोटाबंदीचा निर्णयाचा सामान्य नागरीकांना त्रास झाला, पण तो त्यांनी सहन केला. या निकालामुळे नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता हे सिध्द झाले आहे. आता काळ्या पैशाबाबत आता देशभरात कारवाई सुरु आहेत. अवघ्या तीन वर्षातच पंतप्रधान मोदी यांनी देशातील सामान्य जनतेचा विश्वास मिळवला आहे. सामान्य नागरीक सुखी व सुरक्षीत हेच पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न होते, विवीध विमा योजनांच्या माध्यमातून मोदी यांनी नागरीकांना कायम सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या तीन वर्षात विरोधकांनी मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
मोदींच्या कार्यपध्दतीवर जनतेचा विश्वास : चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 16:20 IST