शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

लॉकडाऊन शिथिलपूर्वीच लोक रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 5:15 PM

कोल्हापूर : लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वीच लोकांची रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. बहुतांश परिसरांतील बॅरिकेड हटविल्याने नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन ...

ठळक मुद्देकोल्हापूर  शहरातील चित्र : दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली : हातावर पोट असणाऱ्यांनी दुकाने उघडली : बाजारपेठ, भाजी मंडईत गर्दी कायम  कोल्हापूर महापालिकेसमोरील मसाल्याची दुकानेही सुरू झाली आहेत.

कोल्हापूर : लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वीच लोकांची रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. बहुतांश परिसरांतील बॅरिकेड हटविल्याने नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन बाहेर पडले आहेत. काही ठिकाणची कोल्ड्रिंक्सची दुकाने, दुचाकी दुरुस्ती करणारी गॅरेज, इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीची दुकाने उघडली आहेत. सोशल डिस्टन्सिंग, शासनाच्या नियमांनुसार त्यांच्याकडून व्यवसाय सुरू आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र शासनाकडून १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. तसेच ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी अथवा रुग्णच आढळून आलेले नाहीत, अशा परिसरात ३ मेनंतर काही अटींवर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोल्हापुरातील कोल्ड्रिंक्स हाऊस, होलसेल दुकाने, कुलूप विके्रते, आॅप्टिशियन, चहाच्या टपºया, बांगड्या विक्री करणारे (कासार), इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती, पंक्चर काढणारे मिस्त्रींनी महिन्यानंतर दुकाने सुरू केली आहेत. शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये रस्त्यांवर विक्रीसाठी माठ ठेवण्यात आले आहेत.दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ वाढलीऔद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. कामगार कामावर येत असल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवरील बॅरिकेड्स काढण्यात आली आहेत. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे.---------------------------------------गेल्या सव्वा महिन्यापासून कोल्हापुरातील बहुतांश नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले आहे. मात्र, घरातून बाहेर पडले नसल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे, अशा नागरिकांचा आता संयम सुटत आहे. त्यांच्याकडून किरकोळ स्वरूपात व्यवसायांना सुरुवातही केली जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनानेही कडक भूमिका घेणे कमी केले आहे.----------------------------------------लॉकडाऊन शिथिलबाबत अस्पष्टतालॉकडाऊन शिथिलबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत राज्य शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. याचवेळी सोशल मीडियावर काही व्यवसायांना सवलत दिली असल्याचा संदेश पसरला. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस