महालक्ष्मी संघ बुडवल्याचे लोक विसरलेले नाहीत : अरुण नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:44 IST2021-04-30T19:38:21+5:302021-04-30T19:44:42+5:30
GokulMilk Kolhapur : गोकुळचे सभासद फार हुशार आहेत. कोणी काय केले, याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. महालक्ष्मी दूध संघ कोणी बुडविला, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

महालक्ष्मी संघ बुडवल्याचे लोक विसरलेले नाहीत : अरुण नरके
कोल्हापूर : गोकुळचे सभासद फार हुशार आहेत. कोणी काय केले, याचा हिशेब त्यांच्याकडे आहे. महालक्ष्मी दूध संघ कोणी बुडविला, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
अरुण नरके म्हणाले की, गेली ४४ वर्षे दूध संघाच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात होतो. आता सुपुत्र चेतन नरके हे सत्तारूढ आघाडीकडून उभे आहेत. स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांनी ह्यगोकुळह्णमध्ये संधी दिली, त्याचे सोने केले. दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून काम केल्याने हे वैभव उभे राहिले; मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत या वैभवाची बदनामी विरोधी आघाडीकडून सुरू आहे.
मंत्री, आमदार, खासदारांना गोकुळ का हवा आहे? हे ह्यगोकुळह्ण सक्षम असल्याचे धोतक आहे. त्यामुळेच प्रत्येकाला आपण दूध संघात जावे, असे वाटते. चुकीचा कारभार असता तर तिथे जायला कोणी धाडस केले नसते. सभासदांच्या भल्यासाठी संस्थांमध्ये गाठोडे बांधून ठेवायचे असते, हे स्वर्गीय डी. सी. नरके यांची शिकवण कायम मनात ठेवून संस्थांमध्ये आम्ही काम केले, त्यामुळेच आज ४०० कोटीच्या ठेवी होऊ शकल्या.