शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगा निर्मितीत खादीचाच ‘झेंडा’, सॅटिनच्या कापडापेक्षा प्राधान्य; केंद्र सरकारने केला ध्वजसंहितेत बदल

By संदीप आडनाईक | Updated: August 14, 2023 12:16 IST

ही आहेत निर्मितीची केंद्रे

संदीप आडनाईककोल्हापूर : ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झेंडे लागणार असल्यामुळे केंद्र सरकारने तिरंगा ध्वज निर्मितीसाठी खादीशिवाय सॅटिनच्या कापडालाही परवानगी दिली. यामुळे पारंपरिक झेंडा उत्पादन करणारा खादी उद्योग अडचणीत आला तरी अजूनही लोकांचा तिरंग्यासाठी ‘खादी’वरच विश्वास आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय ध्वज नियमावलीत बदल करून खादीव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या (सॅटिन) कापडाच्या झेंड्यांना परवानगी दिल्यामुळे २० ते २५ रुपयांपासून झेंडे उपलब्ध आहेत; पण खादीच्या ध्वजनिर्मितीचा खर्चच २०० रुपयांवर जातो. असे असले तरी इतर कापडाच्या तुलनेत खादीच्याच झेंड्यावर लोकांचा विश्वास आहे. सर्व सेवा संस्था, शासकीय कार्यालये, शाळा आणि गडकिल्ल्यांवर फडकवण्यासाठी खादीचाच झेंडा वापरला जातो. खादीच्या झेंड्याला जीएसटी लागू नाही; पण यंदा १० ते १५ टक्के दरवाढ झाल्याची माहिती कोल्हापूर खादी ग्रामोद्योग संघाचे संयोजक सचिन पाटील यांनी दिली.ध्वजनिर्मितीचे अधिकार खादी आयोगाकडे२२ जुलै १९४७ मध्ये खादीचा राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा बंगळूरु येथेच तयार झाले. याचा आकारही २ बाय ३ असा होता. कायद्यानुसार खादी किंवा रेशमापासूनच राष्ट्रध्वज तयार करण्याचे संकेत होते. ध्वजनिर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालय निश्चित करते तर ध्वज निर्मिती आणि वितरणाचे अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडेच आहेत.

ध्वजसंहितेत बदल, सामान्यांना परवानगी२००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजनिर्मितीचा एकमेव निर्माता होता. २००२ मध्ये नवीन जिंदाल यांच्या याचिकेवरील सुनावणीत सर्वसामान्यांना ध्वज वापराला परवानगी देण्यासाठी संहितेत सुधारणा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे केंद्र सरकारने २०२१ मध्ये ध्वजसंहितेत बदल करून सामान्यांसाठी सॅटिनच्या कापडाच्याही वापराला परवानगी दिली.

ही आहेत निर्मितीची केंद्रेपूर्वी उदगीर (लातूर), कर्नाटकातील हुबळी येथे राष्ट्रध्वज निर्मितीचे केंद्र होते. आता सोलापूर, मुंबईतील कलवरा ग्रामोदय आश्रम आणि नांदेड येथेही तो तयार होतो. वैयक्तिक वापरासाठीचा राष्ट्रध्वज फडकवला जात नाही. शासकीय संस्था, शाळा, ग्रामपंचायती एक फुटापासून आठ फुटापर्यंतचे राष्ट्रध्वज वापरते. गडावर फडकवण्यासाठी मात्र १४ फुटाचाच राष्ट्रध्वज वापरतात.

खादीच्या तिरंग्यांच्या किमती१ बाय दीड फूट : २७५२ बाय ३ : १०५५३ बाय ४.५ :२०१०४ बाय ६ : २९७०६ बाय ९ : ७५००८ बाय १२ : १०, १७०१४ बाय २१ : ३२,०००

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन