शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून ११०० कोटींचे पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:33 IST

कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकाच्यामाध्यमातून जुलैअखेर अकराशे कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिली. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट्याच्या ७९ टक्के काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून ११०० कोटींचे पीक कर्जजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती : उद्दिष्ट्याच्या ७९ टक्के काम

कोल्हापूर : जिल्हयातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकाच्यामाध्यमातून जुलैअखेर अकराशे कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिली. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट्याच्या ७९ टक्के काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १३८८ कोटी ३६ लाखाचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून गेल्या चार महिन्यात अकराशे कोटींचे पीककर्ज वाटप करुन बँकांनी विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे.दोन महिन्यापूर्वी पीक कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकाचे केवळ आठ टक्के काम होते, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बँकांना पीक कर्ज वितरणाचे काम गतीमान करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात सुधारणा करुन केवळ दोन महिन्यात हे काम ४५ टक्क्यांवर नेले आहे.जिल्हयातील राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकांनी सर्वसामान्यांचे विशेषत: शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेऊन कर्ज वाटपात सकारात्मक भूमीका घ्यावी, प्रत्येक व्यक्तीला विमा योजनांचा लाभ व्हावा यासाठी विमा योजनेत सर्व खातेदारांना समावेश करून घ्यावे, यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर