इंदुमती गणेशकोल्हापूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फक्त ३५१ रुपये भरा आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साडी अर्पण करा, ११ हजार रुपये भरा देवीचा प्रसाद, हळदी-कुंकू मिळवा. समाज माध्यमावरील एआय जनरेटेड व्हिडीओच्या माध्यमातून भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.
यजमानसारख्या अनेक पेजवरून केल्या जाणाऱ्या या जाहिरातींना हजारो व्हि्यूज आणि लाइक असून, ते मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती किंवा अंबाबाईचे श्रीपूजक यांनी यापूर्वीही सायबर क्राइम विभागाला तक्रार केल्यानंतरही कारवाई झाली नाही.देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवता असलेल्या श्री अंबाबाईच्या नावाखाली अनेक समाज माध्यमांवरून भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. आता सध्या सुरू असलेल्या एका एआय जाहिरातीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंबाबाईला साडी अर्पण करणे भाग्याचे असून, फक्त ३५१ रुपये पाठवून तुम्ही साडी अर्पण करू शकता.
वाचा: अंबाबाईच्या दर्शनाचा मार्ग प्रशस्त होणार; सुधारित ५९५ कोटींच्या आराखड्यात प्रस्तावित त्यानंतर तुम्हाला २४ तासांच्या आत पूजेचा विधी, ब्लाऊज पीस, आणि हळदी-कुंकू पाठवले जाईल. बुकींग स्लॉट मर्यादित आहे, लवकर बुकींग करा, असे सांगितले जात आहे. याबाबत देवस्थान समिती आणि श्रीपूजकांना विचारले असता, ही सगळी फसवणूक असल्याचे सांगण्यात आले. देवस्थान किंवा पुजारी यांच्याकडून अशी कोणतीही जाहिरात केली जात नाही.
अधिकृत वेबसाइट, पेजची खात्री कराअधिकृत पूजा विधी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ या दोन जबाबदार घटकांकडून केल्या जातात. तसे त्यांच्या समाज माध्यमांवर अधिकृत वेबसाइट आहेत.
यापूर्वीही फसवणूक
- छत्रपती संभाजीनगरमधील महिला भाविकाने एका श्रीपूजकांचे नाव वाचून ११ हजार रुपये संबंधितांना पाठवले. प्रसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी श्रीपूजकांना विचारणा केली, तेव्हा फसवणूक झाल्याचे कळाले.
- तीन वर्षांपूर्वी अंबाबाईला नव्याने दागिने घडवण्यात येणार आहे, तुमच्या इच्छेने सोने दान करा, या जाहिरातीवर एका महिला भाविकाने ४० तोळे सोने दिले होते. नंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजले.
- अंबाबाई मंदिरात जे विधी केले जात नाही, अशा विधींच्या नावाखाली जाहिराती करून ५ हजार, ७ हजार, ११ हजार, २१ हजार रुपयांची मागणी केली जाते. गेल्या पाच वर्षांत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
तक्रारी बेदखलपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी सायबर क्राइमकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. तपासणी करताना पेज कधी परदेशातले लोकेशन दाखवतात, तर कधी अन्य राज्यातील. मायाजाल असलेल्या समाज माध्यमावरील जाहिराती आज सुरू असतात पैसा मिळाला की, दिसायचे बंद होतात. या विश्वावर बंधन नाही. कारवाई करायची, तर कुणावर आणि कुठे, असा त्यांच्यासमाेर प्रश्न आहे.
समितीने अशा जाहिरातीविरोधात याआधीही तक्रार केली होती. अंबाबाईच्या पूजाविधी, देणगी याबाबत देवस्थान समितीची अधिकृत वेबसाइट आहे. समाज माध्यमांवरील फसव्या जाहिरातींवर भाविकांनी विश्वास ठेऊ नये. अधिकृततेची खात्री करूनच देणगी पाठवावी. - शिवराज नाईकवाडे, सचिव देवस्थान समिती
देवस्थान समिती असो किंवा श्रीपूजक कोणाकडूनही अशा जाहिरातीतून देणगी घेतली जात नाही. ही भाविकांची फसवणूक आहे. आम्ही वारंवार पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. अशा प्रकारांवर वॉच ठेऊन ते बंद करण्यात यावेत. - माधव मुनिश्वर, सचिव, श्री अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ
Web Summary : Devotees are being defrauded through AI-generated videos promising saree offerings and prasad to Ambabai temple for a fee. Despite complaints, no action has been taken against these fraudulent online ads. Devotees should verify the authenticity of websites before donating.
Web Summary : अंबाबाई मंदिर में साड़ी और प्रसाद चढ़ाने के नाम पर एआई-जनित वीडियो के माध्यम से भक्तों को ठगा जा रहा है। शिकायतों के बावजूद, इन धोखाधड़ी वाले ऑनलाइन विज्ञापनों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है। दान करने से पहले वेबसाइटों की प्रामाणिकता सत्यापित करें।