हातकणंगले पंचायत समिती सभापतिपदी जनसुराज्यचे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:00+5:302021-01-23T04:24:00+5:30
हातकणंगले : नाट्यपूर्ण घडामोडी, भाजपा, महाडिक समर्थकांच्या नाराजीनंतर हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदी जनसुराज्य पक्षाचे डॉ. प्रदीप पाटील (टोप) ...

हातकणंगले पंचायत समिती सभापतिपदी जनसुराज्यचे पाटील
हातकणंगले : नाट्यपूर्ण घडामोडी, भाजपा, महाडिक समर्थकांच्या नाराजीनंतर हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदी जनसुराज्य पक्षाचे डॉ. प्रदीप पाटील (टोप) यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या सभाध्यक्षपदी तहलसीदार प्रदीप उबाळे होते. निवडीनंतर जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने जनसुराज्यचे पाच आणि भाजपच्या सहा सदस्यांची गुरुवारी (दि. २१) रात्री कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. भाजपमधील महाडिक आणि हाळवणकर समर्थकांनी ताराराणी आघाडीला बरोबर घेण्यास विरोध केला. हाळवणकर समर्थकांनी आवाडे गटाला बरोबर घेतल्यास तीन सदस्य निवड प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला; तर महाडिक समर्थक भाजप सद्स्य उत्तम सावंत पाहिल्यांदा सभापतिपद मिळावे यावर ठाम राहिले. अखेर वादावादीमध्ये सभापतिपद जनसुराज्यकडे देण्याचा निर्णय झाला.
..........
‘राजाराम’चे संदर्भ
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक गटाने ‘जनसुराज्य’ला सोबत घेण्यासाठी तसेच टोप परिसरामध्ये असलेल्या सभासदांची बेेरीज करण्यासाठी सभापतिपद सोडल्याची चर्चा होती.
...........
यांची अनुपस्थिती
सभापती निवडीच्या या सभेला भाजपचे उत्तम सावंत, वैजयंती अंबी, कॉंग्रेसचे महाडिक समर्थक राजकुमार भोसले गैरहजर राहिले. जनसुराज्यचे ५, भाजपचे ४, शिवसेना २, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ असे १४ सदस्य हजर होते.
................
ताराराणी आघाडीचा बहिष्कार
आमदार आवाडे यांच्या ताराराणी आघाडीच्या पाच सदस्यांनी सभापती सभेवर बहिष्कार टाकला.
हाळवणकर समर्थक भाजप सदस्या रेश्मा सनदी, अंजना शिंदे, पौर्णिमा भोसले यांनी ताराराणी आघाडीला सोबत घेतल्यास निवड प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.
..............
२२ प्रदीप पाटील