शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाची चार लाखांची रोकड विसरली, कोल्हापुरातील रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली; पोलिसांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:15 IST

फुकटचे पैसे आम्हाला नकोत

कोल्हापूर : तब्बल चार लाखांची रोकड असलेली पिशवी सापडल्यास ती आपल्याकडेच ठेवण्याचा मोह कोणालाही झाला असता. पण, लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणारे रिक्षाचालक शेखर रामचंद्र जाधव (वय ५९) यांनी रिक्षात प्रवाशाने विसरलेली चार लाखांची रोकड काही क्षणात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जमा केली.

विसरलेले पैसे परत मिळाल्याने प्रवासी अथर्व नारायण पुजारी (रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) यांनी रिक्षाचालकाचे आभार मानले, तर पोलिसांनी सत्कार करून रिक्षाचालक जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. ही घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी घडली.जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नृसिंहवाडीत राहणारे अथर्व पुजारी कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात ते एका रिक्षात (एमएच ०९ जी ८०२५) बसून महाद्वारला उतरले. रिक्षाचे भाडे देऊन ते निघून गेले. मात्र, त्यांची पिशवी रिक्षातच विसरली.

काही अंतर पुढे गेल्यानंतर रिक्षाचालक शेखर जाधव यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पिशवी उघडून बघितले, तर त्यात नोटांचे बंडल होते. त्यांनी मागे फिरून प्रवाशाचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. तशीच रिक्षा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घेऊन त्यांनी रोकड पोलिसांकडे जमा केली.त्यानंतर दोन तासांत प्रवासी पुजारी हे रोकड रिक्षात विसरल्याची तक्रार द्यायला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोहोचले. तिथे रोकड सुरक्षित असल्याचे समजताच त्यांचा जीव भांड्यात पडला. रिक्षाचालक जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.फुकटचे पैसे आम्हाला नकोतशेखर जाधव हे गेल्या ३० वर्षांपासून शहरात रिक्षा चालवतात. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पत्नी आणि दोन मुलांसह ते लक्षतीर्थ वसाहत येथील घरात राहतात. त्यांचा एक मुलगा खासगी कंपनीत नोकरी करतो, तर दुसरा मुलगा भाड्याच्या जागेत दुकान चालवतो. रिक्षात विसरलेले पैसे परत केल्याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. 'आमच्या कष्टाने पुरेसे पैसे मिळतात. यातच आम्ही समाधानी आहे. आम्हाला कुणाचे फुकटचे पैसे नकोत,' असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांचा प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Rickshaw driver returns passenger's lost ₹4 lakh, earns praise.

Web Summary : In Kolhapur, a rickshaw driver, Shekhar Jadhav, returned ₹4 lakh left by a passenger, Atharva Pujari, to the police. Pujari was grateful, and police honored Jadhav for his honesty, stating he refused easy money, content with his earnings.