शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यात निवडणूक कार्यक्रम सुरू

By admin | Updated: December 4, 2014 23:37 IST

सहकारी संस्था : पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील १८, तर ‘क’ वर्गातील ८४ संस्थांच्या निवडणुका

कोतोली : पन्हाळा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील १८, तर ‘क’ वर्गातील ८४ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण १८३ संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी व मार्चअखेर पूर्ण होणार आहे.तालुक्यातील विकास संस्था, दूध संस्था, गृहनिर्माण संस्था, पाणीपुरवठा, मजूर, औद्योगिक अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. त्यामुळे संचालक मंडळास तब्बल दीड वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळाला. निवडणूक प्राधिकरण नियुक्ती व लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्य निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात सहकारी संस्थांचा कार्यक्रम तालुका सहकार निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक एस. बी. येजरे यांनी जाहीर केला. ज्या सहकारी संस्थेची सभासद संख्या दोनशेपेक्षा कमी आहे, अशा विविध संस्था ‘ड’ वर्गामध्ये येतात. त्यामध्ये गृहनिर्माण, पाणीपुरवठा, औद्योगिक आणि मजूर संस्थांचा समावेश आहे, तर ‘क ’ वर्गामध्ये १० लाखांपेक्षा कमी वसूल भाग-भांडवल असणाऱ्या सेवा संस्था, पतसंस्था, दोनशेपेक्षा जास्त सभासद असलेल्या गृहनिर्माण, ग्राहक संस्था, औद्योगिक संस्था, शासकीय साहाय्य नसलेल्या प्रक्रिया संस्था (साखर कारखाने वगळून), सर्व पणन संस्था, विणकर हातमाग संस्था व कृषी संस्थांचा यात समावेश आहे. गृहनिर्माण, औद्योगिक, दूधसंस्था राजकीय सोयीसाठी स्थापन झालेल्या या संस्थांच्या आर्थिक उलाढाली कमी प्रमाणात असतात. त्यामुळे काही संस्था सुरू, तर काही बंद अशी अवस्था आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून या संस्थांच्या निवडणुकाच नाहीत. मात्र, नवीन नियमानुसार निवडणुका घेणे बंधनकारक आहे. (वार्ताहर)संस्थांनी त्वरित माहिती द्यावी : येजरेउपरोक्त तालुक्यातील संस्थांचा निवडणूक कार्यक्रम चालू झाला असून, अद्याप ज्या संस्थांची विहित नमुन्यातील माहिती दिलेली नाही, अशा सर्व संस्थांनी माहिती लवकरात लवकर पन्हाळा कार्यालयात जमा करण्याचे आवाहन सहायक निबंधक एस. बी. येजरे यांनी केले आहे.