शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीसह आजरा, गगनबावड्यात अतिवृष्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:19 IST

धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस, विसर्ग वाढला

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. राधानगरी, गगनबावडा, आजरा व चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी ३४.०२ फुटांच्या वर गेली असून, पाणी पुन्हा पात्राबाहेर फेकले गेले आहे. आता इशारा पातळीकडे (३९ फूट) आगेकूच ठेवली असून, कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. दिवसभरात तब्बल ६ फुटांनी वाढ झाल्याने ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.शनिवारपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. रविवारपासून मात्र पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सोमवारी सकाळपासून एकसारख्या सरी कोसळत आहेत. वाऱ्यासह जोरदार सरी येत असल्याने पाणी पाणी होत आहे. राधानगरीसह चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस होत असल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले होते. सोमवारी सकाळी एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला असून, तीन दरवाजे सुरू आहेत. सध्या धरणातून प्रतिसेकंद ५,७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी २६ फुटांपर्यंत होती. रात्री १० वाजता ती ३२ फुटांपर्यंत पोहोचली होती. पाणी वाढण्याचा वेग इतका जोरात होता की, दिवसभरात तब्बल ६ फुटांनी पाणी पातळीत वाढ झाली. पंचगंगेसह भोगावती, कुंभी, कासारी नदीचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले आहे. तब्बल ४२ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

दहा सर्कलमध्ये अतिवृष्टीजिल्ह्यातील राधानगरी, सरवडे, कसबा वाळवे, राशिवडे, कडगाव, आजरा, गवसे, हेरे, नागणवाडी, चंदगड या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. विशेष म्हणजे येथे ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस

जिल्ह्याच्या ऑगस्ट अखेरच्या सरासरी पावसाच्या ८७ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. गेल्या वर्षी केवळ ५६ टक्केच पाऊस होता.पडझडीत ७.१५ लाखांचे नुकसानजिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २९ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ७ लाख १५ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

असा सुरू आहे धरणातील विसर्ग, प्रतिसेकंद घनफूट राधानगरी : ५,७८४तुळशी : १,०००वारणा : १,४६५दूधगंगा : १,०००कासारी : ९००कुंभी : १,०००पाटगाव : १,५८८घटप्रभा : ६,४८०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदी