पंचायत बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:54+5:302020-12-24T04:21:54+5:30
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यास चालू झाल्याने अनेक इच्छुक बाहेर पडले आहेत. यामध्ये मोठ्या ...

पंचायत बातम्या
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यास चालू झाल्याने अनेक इच्छुक बाहेर पडले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आहे. यानिमित्ताने अनेक सामाजिक कार्यक्रमात मोठा संपर्क केला जात आहे. गावातील मुख्य असलेले मात्र अजून कासवगतीने आहेत. यामध्ये माजी सदस्य उभे राहण्यासाठी चाचपणी करीत आहेत.
-----------------
शेताच्या बांधावर निवडणुकीची चर्चा
अर्जुनवाड : अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, आदी ठिकाणी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक होत आहे. यानिमित्ताने सर्वत्रच राजकीय चर्चेला उधाण आले आहे. गल्लीपासून शेताच्या बांधापर्यंत राजकीय चर्चेला रंग येत आहे. निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे याची गणिते मांडली जात असली तरी माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
-----------------------
शिरटीमध्ये एक अर्ज दाखल
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी पहिल्या दिवशी शिरटी प्रभाग पाचमधून एकमेव अर्ज दाखल झाला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत नऊ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात इच्छुक उमेदवार लागले आहेत.