शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:58 PM

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११. ३० च्या सुमारास पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा दिल्या.

ठळक मुद्देकोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वजपाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध, शहीद जवानांना श्रध्दांजली

कोल्हापूर : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११. ३० च्या सुमारास पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा दिल्या.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे  गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. कोल्हापूरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला. शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

अभाविपचे महानगर मंत्री सोहम कुरहाडे, जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, आकाश हटकर, साधना वैराळे, मिहीर महाजन, महेश चौगुले आदि कार्यकर्ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर जमले आणि त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीही सहभागी झाले होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूर