आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ...
तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टँकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2119.34 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 18.37 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 55 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 3.43 मिमी पावसाची नोंद झाली. ...
अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती ...
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बंदी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अपर जि ...