कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे काम का रेंगाळले आहे? याची माहिती घेऊन हे प्राधिकरण ठेवायचे की रद्द करायचे, याचा निर्णय पंधरा दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ...
‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपने आयोजित केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेत सोमवारी ६५ प्रजातींच्या ५२५ पक्ष्यांची नोंद केली गेली. यातील ९ प्रजाती या स्थलांतरित पक्ष्यांच्या आहेत. जिल्ह्यातून ३५ पेक्षा जास्त पक्षीनिरीक्षकांनी यामध्ये सहभाग नों ...
राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालि ...
छत्रपती शाहू स्टेडियमवर पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यामध्ये झाला. पहिल्या मिनिटापासूनच कोल्हापूर पोलीस संघाने सामन्यावर पकड निर्माण केली. कोल्हापूर पोलीस संघाच्या ताहिद मालदीने पाचव्या मिनिटाला गोल करीत सामन्यावर प ...
पूरबाधित उसाचे नुकसान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राधान्याने या उसाची उचल करण्याचे आदेश देऊनही त्याकडे साखर कारखान्यांनी पाठ फिरविली आहे. अद्याप २३ हजार हेक्टरवरील ऊस शिवारातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘पंचगंगा’, ‘जवाहर ...
विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. ...
यंदा प्रथमच कोल्हापूर केंद्रावर सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ जानेवारी २०२० पासून आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीतील २१ बालनाट्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात, तर उर्वरित १८ सांगली येथे सादर केली जाणार आहेत. ...