मार्केट यार्ड येथील शाहू कुस्ती आखाड्याचे वस्ताद रंगराव ठाणेकर (वय ७५) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी होणार आहे. मुळचे शाहूवाडी तालुक्यातील बजागवाडी येथील ...
शहरातील नाले सफाईच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. एकीकडे कोरोना संसर्ग, लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना मदतीचा हात देत असताना दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणे आवश्यक असल्याने तेही काम सुरू करण्यात आले. ...
आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाºया महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची ही वेळ आहे. संचारबंदीमुळे घरातून बाहेर जरी पडता येत नसले, ...
शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आह ...
कोल्हापूरवर आलेल्या प्रत्येक आपत्तीवेळी धनंजय महाडिक युवाशक्ती धाऊन जाते. ‘कोरोना’च्या संकटातही युवाशक्तीने मदतीचा ओघ कायम ठेवला असून, पुणे, मुंबईतून कामासाठी कोल्हापुरात आलेले आणि ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आ ...
शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या ...
एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण ...
कोल्हापूर पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसात जप्त केलेली सुमारे २५७२ वाहने ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच मालकांना परत देण्यात येणार आहे. सद्या लॉकडॉऊन येत्या मंगळवारपर्यत असला तरीही ‘कोरोना’ची व्याप्ती पहाता लॉकडाऊन स्थिती एप्रिल अखेरपर्यत वाढण्याची शक्यता वर्तव ...
कोरोनाबाधित महिला आढळून आल्यामुळे धसका घेतलेल्या मराठा कॉलनी व परिसरातील रहिवाशांच्या मनावरील ताणतणाव हळूहळू कमी होत असून, तेथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस प्रशासन तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी घरपोहोच सेवा देण्यास सुरुवात केल्यामुळे रह ...
कोरोनाचा गुणाकार वाढत असतानाच कोल्हापूरसाठी दिवसभरातले दुसरे धक्कादायक वृत्त आले आहे. सकाळच्या शाहुवाडी तालुक्यातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कोरोना केंद्रात गुरुवारी दुपारी एका रुग्ण ...