corona in kolhapur-कलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 04:40 PM2020-04-10T16:40:58+5:302020-04-10T16:41:59+5:30

कोल्हापूरवर आलेल्या प्रत्येक आपत्तीवेळी धनंजय महाडिक युवाशक्ती धाऊन जाते. ‘कोरोना’च्या संकटातही युवाशक्तीने मदतीचा ओघ कायम ठेवला असून, पुणे, मुंबईतून कामासाठी कोल्हापुरात आलेले आणि ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच रजपूतवाडी येथील गरजू कुटुंबांनाही जीवनाश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.

corona in kolhapur - Distribution of essential commodities from 'Youthpower' to artists | corona in kolhapur-कलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने रजपूतवाडी (ता. करवीर) येथे गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देकलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपकलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर : कोल्हापूरवर आलेल्या प्रत्येक आपत्तीवेळी धनंजय महाडिक युवाशक्ती धाऊन जाते. ‘कोरोना’च्या संकटातही युवाशक्तीने मदतीचा ओघ कायम ठेवला असून, पुणे, मुंबईतून कामासाठी कोल्हापुरात आलेले आणि ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच रजपूतवाडी येथील गरजू कुटुंबांनाही जीवनाश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.

पुण्या-मुंबईवरून सुमारे दीडशे कलाकार कामानिमित्त कोल्हापुरात येऊन राहिले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा कुटुंबांना युवाशक्तीच्या वतीने रेशन धान्याचे सुमारे दीडशे किट यावेळी देण्यात आली. पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि नगरसेवक शेखर कुसाळे, पप्पू रजपुत, मुकुंद सुतार, रवी सुतार, मेघराज सुतार यांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, रजपूतवाडी येथे अनेक कष्टकरी, गरजू, हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांना जेवण आणि रेशन देण्यात आले. महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य परिसरातील शेकडो कुटुंबांना देण्यात आले. गरजूंच्या मदतीसाठी लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जीवनसिंग रजपूत, सरपंच आक्काताई कुंभार, उपसरपंच बाजीराव मस्कर, परशराम बैलकर, जीवन चव्हाण, तानाजी गोसावी, रामचंद्र गोसावी, परशराम गोसावी, संदीप गोसावी, सखाराम गोसावी, उमेश गोसावी उपस्थित होते.
 

 

Web Title: corona in kolhapur - Distribution of essential commodities from 'Youthpower' to artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.