शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Oxygen Shortage: “आम्ही ऑक्सिजनचा साठा वेळीच पुरवला होता, मग...”; कोल्हापूर महापालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 18:15 IST

ऑक्सिजन नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजताच मी स्वतः याठिकाणी येऊन तपासणी केली. शुक्रवार ३० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडून हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा झाला होता

ठळक मुद्देकोल्हापूरमध्ये एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडल्याची घटना घडलीकरवीर तालुक्याच्या गिरगावात राहणाऱ्या माजी सैनिकाने सोडले प्राण कोल्हापूर महापालिकेने हात झटकले, रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले

कोल्हापूर – राज्यात एकीकडे ऑक्सिजन तुटवडा होत असताना दुसरीकडे कोल्हापूरातऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजन अभावी हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत असला तरी आम्ही ऑक्सिजनचा साठा पुरवला होता. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणा यातून दिसत आहे. तरीही प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिले आहे.

या प्रकरणावर निखील मोरे म्हणाले की, ऑक्सिजन नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजताच मी स्वतः याठिकाणी येऊन तपासणी केली. शुक्रवार ३० एप्रिलपर्यंत प्रशासनाकडून हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा झाला होता. तसेच आणखी एका एजन्सीकडून आज १२ पर्यंत ऑक्सिजन पुरवठा होणार होता. हॉस्पिटलकडे ऑक्सिजनचा साठा होता. पण रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला त्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. नेमका याबाबत आमचे डॉक्टरही तपास करतील. पण सध्या प्रथमदर्शनी ऑक्सिजनचा साठा पुरेसा असतानाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचं दिसून येते. याबद्दल पुढची कारवाई चालू आहे. डिटेल पंचनामा करण्यात येईल. नातेवाईकांनी जो आरोप लावलाय त्याबाबत पोलीसही माहिती घेत आहेत. जी काही माहिती समोर येईल त्यानंतर या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूरमध्ये एका रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडल्याची घटना घडली. एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे ऑक्सिजनअभावी रुग्णाची प्राणज्योत मालवली. माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय ७५ वर्षे होतं. रंकाळा टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी रुग्णालयात सर्जेराव यांच्यावर उपचार सुरू होते. २६ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील ऑक्सिजनची स्थिती

राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या आहेत. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे  जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन इतका आहे.त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा १०० टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला अशी माहिती मुख्यंत्र्यांनी दिली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरOxygen Cylinderऑक्सिजन