शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर, गगनबावड्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 6:17 PM

: कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.

ठळक मुद्देपंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर, गगनबावड्यात अतिवृष्टी‘राधानगरी’चे पाच दरवाजे खुले, ४२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.

गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एका दिवसात तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ सायंकाळी ती ३० फुटांवर पोहोचली आहे. ४२ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्यमार्ग आणि पाच जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. नृसिंहवाडीतील दत्तमंदिरात पुन्हा पाणी आले आहे.शिरोळ, हातकणंगले वगळता जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर शहरात सकाळपासून पावसाची उघडझाप राहिली. सायंकाळी पुन्हा त्याचा जोर वाढू लागला. जिल्ह्यात विशेषत: गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा या तालुक्यांत तुफानी पाऊस सुरू आहे.

कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लजमध्ये जोर नसला तरी पावसात सातत्य आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तेथे अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी दुपारी खुला झाला. खुले झालेल्या दरवाजांची संख्या पाच झाली आहे. सातपैकी पाच दरवाजातून आठ हजार ५४० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हीच परिस्थिती अन्य धरणांचीही आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली असल्याने त्यातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणेतून ११ हजार ७०३, काळम्मावाडी धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. कासारीतून १२००, पाटगावमधून १८७४, कुंभीतून १४००, तुळशीतून ११०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयनेतून ८७ हजार, अलमट्टीतून एक लाख नऊ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.पाणीपातळीत वेगाने वाढबुधवारी (दि. ४) सायंकाळी पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी २२ फुटांवर होती. ती गुरुवारी सायंकाळपर्यंत ३० फुटांवर पोहोचली आहे. एका दिवसात पाणीपातळीत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. पाणी वेगाने वाढत असून पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. ती संख्या काल १६ होती, आज ती ४२ वर पोहोचली आहे.सोमवारपर्यंत अतिवृष्टीचा इशाराभारतीय हवामान खात्याने ५ ते ९ आॅगस्ट या काळात कोल्हापूर, साताऱ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर