शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul politics: नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:20 IST

दीडशे संस्था असतील तरच उमेदवारी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गेल्या वेळची निवडणूक आणि येणारी निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यावेळी साडेतीन हजार सभासद होते, आता साडेपाच हजार सभासद आहेत. एकूणच ही निवडणूक संस्था सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे. त्यामुळे महायुती म्हणून व्यवस्थितपणे निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. महायुती म्हणून काम करीत असताना सर्वांनीच एक लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. संयमाने घेतले पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, असे सूचक वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या भूमिकेबद्दल गुरुवारी व्यक्त केले.जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, गोकुळ दूध संघात संचालिका महाडिक गेली चार वर्षे विरोधात होत्या. आता गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष आहे. म्हणून या वेळेला त्या सभेत घोषणा देणार नाहीत. फलक घेऊन येणार नाहीत. व्यासपीठावर येतील. मात्र, त्या अजून आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत त्यामुळे मी ठरवीन, असे म्हणाल्या आहेत. मात्र, महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःला काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. अन्यथा विनाकारण मतभेद तयार होतील. महायुती म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून लक्ष्मणरेषा घालून घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आपण होतो. यावेळी अध्यक्ष निवडीचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी मी सांगितले होते की, तीन-चार तालुक्यांतील जागा रिक्त आहेत, त्या कायद्याप्रमाणे वाढविता येतात. त्या वाढविल्या पाहिजेत. महायुती म्हणून निवडणुका लढताना उमेदवार देत असताना त्याच्याकडे किती संस्था असाव्यात, याचा विचार व्हायला हवा. सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवार असल्यास त्याच्याकडे सव्वाशे ते दीडशे संस्था असल्यास त्याला उमेदवारी दिली पाहिजे. जे आरक्षणातून येणारे उमेदवार आहेत, यामध्ये महिला, मागासवर्गीय, ओबीसी यांचा समावेश होतो. त्यासाठी ७५ ते १०० संस्था ही अट असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली होती.दीडशे संस्था असतील तरच उमेदवारीमंत्री मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अध्यक्ष निवडीच्या बैठकीवेळी मी असे सांगितले होते की, महायुती म्हणून निवडणुका लढताना उमेदवार देत असताना त्याच्याकडे किती संस्था असाव्यात याचा विचार व्हायला हवा. सर्वसाधारण खुल्या गटातील उमेदवार असल्यास त्याच्याकडे सव्वाशे ते दीडशे संस्था असल्यास त्याला उमेदवारी दिली पाहिजे. जे आरक्षणातून येणारे उमेदवार आहेत, यामध्ये महिला, मागासवर्गीय, ओबीसी यांचा समावेश होतो. त्यासाठी ७५ ते १०० संस्था ही अट असावी, अशी प्राथमिक चर्चा झाली होती.