कागलमध्ये गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:48+5:302021-02-05T07:02:48+5:30
बोरवडे : शिक्षण विभाग पंचायत समिती ...

कागलमध्ये गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन
बोरवडे : शिक्षण विभाग पंचायत समिती कागल यांच्यावतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, शिष्यवृत्ती गंगाजळी ठेव प्रदान आणि उपक्रमशील शाळांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजित डिसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी केले आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित डिसले यांचे ' शैक्षणिक तंत्रज्ञान व माझे तंत्रस्नेही प्रयोग’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, सभापती पूनम मगदूम अध्यक्षस्थानी असणार आहेत.