इब्राहिमपूर शौचालय घोटाळा प्रकरणातील रक्कम जमा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:27+5:302021-02-05T06:59:27+5:30
दुबार आणि अपात्र लाभार्थ्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे अखेर या शौचालय अनुदान घोटाळ्यातील ...

इब्राहिमपूर शौचालय घोटाळा प्रकरणातील रक्कम जमा करण्याचे आदेश
दुबार आणि अपात्र लाभार्थ्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे अखेर या शौचालय अनुदान घोटाळ्यातील कारवाईला वेग आला आहे. इब्राहिमपूर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान वितरणात गैरप्रकार झाला होता. त्या अनुषंगाने अनुदान वितरणामध्ये अनियमितता झाल्याबाबतचा अहवाल चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी सादर केला होता.
त्यामध्ये याप्रकरणी अनियमितता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, संबंधित अहवालामध्ये अनुदान वितरण केलेल्या लाभार्थ्यांना दुबार लाभ दिला आहे की नाही याची स्पष्टता केलेली नसल्याने दुबार लाभार्थी व अपात्र लाभार्थ्यांची यादी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागविली आहे. तसेच त्यांना दिलेली प्रोत्साहन अनुदान रक्कम १५ फेब्रुवारीपर्यंत वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.