युवकांना राजकारणाबरोबर समाजकारणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:47+5:302021-03-09T04:25:47+5:30

शिरोळ : आजच्या परिस्थितीला तरुणांतील उदासीनता नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीने राज्यात युवा वॉरियर्स शाखा उपक्रम सुरू ...

Opportunity for youth to socialize with politics | युवकांना राजकारणाबरोबर समाजकारणाची संधी

युवकांना राजकारणाबरोबर समाजकारणाची संधी

शिरोळ : आजच्या परिस्थितीला तरुणांतील उदासीनता नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीने राज्यात युवा वॉरियर्स शाखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तरुण व युवकांना राजकारणाबरोबरच समाजकारण संधी निर्माण करणे हे वॉरियर्सचा प्रमुख उद्देश आहे, असे प्रतिपादन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले.

शिरोळ येथील नाना कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या कार्यक्रमात भाजपा वॉरियर्स शाखांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. भाजपा युवाच्या वॉरियर्स उपक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत आहे. हजारो तरुणांच्या सहभागामुळे भाजपा फळी मजबूत होताना दिसत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी पृथ्वीराज यादव, अनुप मोरे, सुशील मेंगडे, राहुल महाडिक, जयराज पाटील, सुदर्शन पाटसकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. अरविंद माने, उल्हास पाटील, सचिन सलगर, विशाल पाटील, हर्षवर्धन पवार, श्रीवर्धन देशमुख, विजय घाडगे, अभय गुरव, सुजित पाटील, गजानन संकपाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अनुप मधाळे यांनी आभार मानले.

फोटो - ०८०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरोळ येथे कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Opportunity for youth to socialize with politics