जलतरण तलाव खुला करा ; जिल्हा क्रीडाअधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:52 PM2020-12-07T17:52:50+5:302020-12-07T17:54:14+5:30

Swimming, Kolhapurnews छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाचा जलतरण तलाव खुला करावा या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे येथे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी तलाव खुला असून आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यारून आंदोलक आणि डॉ. साखरे यांच्यामध्ये चांगलीच तू तू में में झाली.

Open the swimming pool; Hamritumari among District Sports Officer agitators | जलतरण तलाव खुला करा ; जिल्हा क्रीडाअधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरी

जलतरण तलाव खुला करा ; जिल्हा क्रीडाअधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरी

Next
ठळक मुद्देजलतरण तलाव खुला करा ; जिल्हा क्रीडाअधिकारी आंदोलकांमध्ये हमरीतुमरीशहर व जिल्हा नागरिक कृती समितीचे अनोखी आंदोलन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाचा जलतरण तलाव खुला करावा या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे येथे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी तलाव खुला असून आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यारून आंदोलक आणि डॉ. साखरे यांच्यामध्ये चांगलीच तू तू में में झाली.

अनलॉकच्या विविध टप्यांमध्ये जलतरण खुला करण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार शहरातील शासनाचा एकमेव जलतरण खुला करण्याची मागणी करण्यात आली होती. 

क्रीडा कार्यालयातर्फे १ डिसेंबर रोजी तलाव खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप तलाव खुला न झाल्याचा आरोप करत कृती समितीतर्फे सोमवारी दुपारी घोषणाबाजी करत तलावामध्ये प्रवेश करण्यात आला. तर त्यांच्या सोबतच्या खेळाडूंनी तलावामध्ये जलतरणाचा सराव केला.

यावेळी जिल्हा क्रीडाअधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे दाखल झाले. त्यांनी शासनाच्या नियमावली नुसार १ डिसेंबर रोजी तलाव खुला करण्यात आल्याचा दावा केला. यावरून आंदोलक आणि जिल्हा क्रीडाअधिकारी साखरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगाला. तलाव सुरू असताना तसेच कोणतीही पूर्व कल्पना न देता करण्यात आलेले हे आंदोलनच बेकायदेशीर असल्याची भूमीका घेतली.

कृती समितीचे रमेश मोरे आणि अशोक पोवार यांनी आंदोलन बेकायदेशी असल्यास गुन्हा दाखल करून कारवाई करा.त्यांनतर तलाव खुला करण्याबाबतचे निवेदन क्रिडा अधिकारयांकडे देण्यात आले. तर शासनाच्या नियमावली नुसार तलाव खुला असल्याचे पत्र देण्याचे क्रिडा अधिकारयांनी मान्य केले. त्यानंतर आंदोलक शांत झाली.

आंदोलनात संभाजीराव जगदाळे, राजेश वरक, श्रीकांत भोसले, रामदास भाले, महादेव जाधव, चंद्राकांत पाटील, कादर मलबारी, रामभाउ कोळेकर, दिग्वीजय साळोखे, विजय पाटील, श्रीवर्धन पाटील, आस्मीता म्हाकवे, अनुष्का भोसले, धैर्यशील भोसले, पंडीत ठमके, गिरीजा मोरे, हार्षाली मोरे, श्रीधन जाधव, अंजूम देसाई, राजेंद्र कोतमिरे, महेश जाधव आदींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला.
 

Web Title: Open the swimming pool; Hamritumari among District Sports Officer agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.