शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका, पिकांनी माना टाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:23 IST

Rain Kolhapur : गेली आठ-दहा दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस पांढरेखड आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. रविवारी कोल्हापूरचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पोहचल्याने ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.

ठळक मुद्देजुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका, पिकांनी माना टाकल्या पांढऱ्याखड आकाशाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोल्हापूर : गेली आठ-दहा दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस पांढरेखड आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. रविवारी कोल्हापूरचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पोहचल्याने ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.यंदा मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुखावला होता. रोहिणीचा पेरा अनेक ठिकाणी साधला होता. भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी या पिकांची उगवण चांगली झाली. त्यात मृग नक्षत्र दणकून लागल्याने भात, ऊस पिकांची वाढ जोमात झाली होती. चार-पाच दिवसांत धुवाधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला.

जोरदार पावसाने भात, ऊस पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी वाढीला हा पाऊस पोषक राहिला. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. २१ जून रोजी सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि पाऊस कमी झाला. या नक्षत्र काळात तीन-चार दिवस पाऊस राहिला मात्र गेली आठ-दहा दिवस पावसाने दडी मारली आहे.पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन या पिकांची आंतरमशागतीचे काम पूर्ण केले आहे. कोळपण, भांगलण केल्याने आता पिकांना पाण्याची ओढ लागली आहे. मशागतीमुळे पिकांची मुळे हलकी झाली आहेत. त्यात उन्हाचा तडाका इतका प्रचंड आहे, की पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.

माळरान, डोंगरमाथ्यावरील पिके कोमजू लागली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मात्र दिवसेंदिवस पांढरेखड आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाविना पिके जगवायची कशी, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.भात रोप लागणी खोळंबल्याजिल्ह्याच्या पश्चिमेकडे भात व नागलीच्या रोप लागणीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होते. भाताचा तरवा लावणीला आला मात्र पाऊस नसल्याने लागण करता येत नाहीत.तरणा पाऊसमॉन्सूनमधील पुनर्वसू (तरणा पाऊस) व पुष्य(म्हातारा पाऊस) ही दोन नक्षत्रांत जोरदार पाऊस असतो.पुनर्वसू नक्षत्र आज, सोमवारपासून सुरू झालाआहे. वाहन उंदीर असून या काळात जेमतेमच पाऊस राहील, असा अंदाज आहे. आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले आहे, पुनर्वसू नक्षत्रात तरी पाऊस लागेल का? याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.तीन-चार दिवस कोरडेच जाणार?आगामी तीन-चार दिवस वातावरणात फारसा फरक दिसत नाही. त्यामुळे या कालावधीत पावसाची शक्यता धुसर असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.असे राहणार तापमान-वार         किमान         कमाल

  • सोमवार      २२               ३१
  • मंगळवार    २१               ३२
  • बुधवार        २३               ३० 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर