शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

टाकीत नुसतीच हवा; पेट्रोल कुठंय भावा?

By admin | Updated: July 10, 2017 23:25 IST

टाकीत नुसतीच हवा; पेट्रोल कुठंय भावा?

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : गाडी पंपावर नेली की अनेकजण अक्षरश: डोळे मिटून इंधन टाकतात. चारचाकी वाहन असल्यास त्याचा चालक इंधन टाकीची चावीच कर्मचाऱ्याच्या हातात देऊन सिटवर सुस्तावतो. दुचाकीस्वारही पेट्रोलच्या डिजिटल काट्याकडे दुर्लक्ष करतात. वाहनधारकांची हीच डोळेझाक त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरत असल्याच दिसून येत आहे. पेट्रोल पंपावर ‘मापात पाप’ होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने धाडसत्र राबवत पंपांची तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यातही गुन्हे शाखेकडून अशी तपासणी केली जात असून सातारा, पाचगणी, शिवडे, उंब्रज, मलकापूर व वाठार येथील पंपांवर छापे टाकले. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर ते मशीनच सील करण्यात आले आहे. अंतिम तपासणीनंतरच त्या पंपावर फसवणूक होत होती अथवा नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, छाप्यानंतर पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत. पंपावर फसवणूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही व्हायच्या. मात्र, या तक्रारींकडे म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नव्हते. एखादा वाहनधारक अशी तक्रार करायचा. पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायचा; पण त्याची दखलच कोणी घेतच नसल्याने या फसवणुकीला तोंड फुटत नव्हते. अखेर गुन्हे शाखेने पंप चालकांची ही काटामारी समोर आणल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. पंपावर फसवणूक कशी होते, हे प्रत्येकजण आता चवीने सांगतोय. तसेच अनेकजण ‘आप बिती’ही कथन करतायत. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड करून फसवणूक केली जात असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासणीनंतर समोर आले आहे. ही छेडछाड तांत्रिकदृष्ट्या असल्यामुळे वाहनधारकांना उघड्या डोळ्यांनी ती दिसत नाही. तसेच कितीही खबरदारी घेतली तरी अशी फसवणूक टाळता येत नाही. वाहनधारकांचा निष्काळजीपणा अनेकवेळा त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरतो. चारचाकी वाहन घेऊन पंपावर गेल्यानंतर अनेक चालक आत बसूनच इंधन टाकीची चावी कर्मचाऱ्याच्या हातावर टेकवतात. ठराविक रकमेचे इंधन भरण्याचे फर्मान सोडून ते सीटवर बसून राहतात. काही वेळानंतर कर्मचारी चावी चालकाच्या हातात टेकवून पैसे घेतो. मात्र, इंधन किती टाकलं, हे विचारण्याची तसदीही चालकांकडून घेतली जात नाही. सध्या काही वाहनांच्या इंधन टाकीला ‘आॅटो लॉक’ सिस्टीम आली आहे. चालकाच्या सिटखाली असलेले बटन ओढल्यानंतर आपोआप इंधन टाकीचे झाकण निघते. अनेकवेळा चालक हेच बटण ओढून सिटवर सुस्तावतात. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता दुपटीने वाढते. दुचाकीस्वार पंपावर गेल्यानंतर शंभरच्या पटीत पेट्रोल भरतात. मात्र, हा आकडा अनेकवेळा फसवणुकीचे कारण ठरतो. काही पंपावर मशीनमध्ये करण्यात छेडछाडीमुळे अशा ‘लमसम’ रकमेच्या पेट्रोल वितरणात काटामारी होण्याची शक्यता असते. तसेच दुचाकीस्वार बोलण्यात अथवा इतर कामात व्यस्त असल्यासही फसवणुकीची शक्यता वाढते. वारंवार नोजल दाबण्याची ‘ट्रीक’४पेट्रोल पंपावरील कर्मचारी इंधन भरत असताना वारंवार नोजल दाबतात. हा प्रकार शंकास्पद असल्याचं काहीजण सांगतात. एकदा स्वीच आॅन केल्यानंतर नोजलसारखं दाबणं म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याचं काहीजणांचं म्हणणं आहे. नोजलाचा संबंध हा थेट मीटरशी असतो. ४मीटरमध्ये २०० रुपयाचं इंधन फीड केलं असेल तर एकदा नोजलचा स्वीच दाबल्यानंतर २०० रुपयांचं इंधन झाल्यानंतर स्वीच आपोआप बंद होईल. स्वीच फक्त मीटर आॅन करण्यासाठी असतो. फीड केलेली व्हॅल्यू संपल्यानंतर मीटर थांबतं. ४पेट्रोल टाकताना जर नोजलचं स्वीच बंद केलं. तर मीटर चालू राहतं. मात्र, पेट्रोल बाहेर येत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन कर्मचारी पेट्रोल टाकताना मध्येमध्ये स्वीच बंद करतात. ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जातं, असं काहीजणांचं म्हणणं आहे. कशी टाळता येईल फसवणूकचारचाकी वाहनातून स्वत: उतरून पंपाचे रिडींग तपासावे. पंपाचे रिडींग शून्य असतानाच कर्मचाऱ्याला इंधन टाकायला सांगावे.वाहनात असून पंप कर्मचाऱ्याच्या हातात टाकीची चावी देणे टाळावे. हा आळशीपणा फसवणुकीला निमंत्रण देणारा ठरतो. डिजिटल मशीन असलेल्या पंपावर इंधन भरावे. कंपनी संचालित असेल तर उत्तम. तिथे पेट्रोलची किंमत सेट केल्यावर पेट्रोलचा फ्लो सुरू होण्याआधी कर्मचारी एक टोकन स्वाईप करतात. त्यामुळे फसवणूक होत नाही.पाईप एकदा टाकीत घालून नोझल दाबला की कर्मचाऱ्याला त्याचा हात काढून घ्यायला सांगावा. स्वत: पाईप पकडावी. शंभर, दोनशे असे ‘राऊंड फिगर’ इंधन टाकण्यापेक्षा ‘आॅड’ किमतीचे इंधन भरावे. त्यासाठी सुटे पैसे स्वत:जवळ ठेवावेत. स्कूटर आणि महिला वापरत असलेल्या स्कूटरेट गाड्यांची टाकी सिटखाली असते. अनेकदा डिकीत काही सामानसुद्धा असते. डिकी उघडणे, गाडी स्टँडला लावणे यात मशीनवरच्या आकड्यांकडे दुर्लक्ष करू नये. इंधन कमी भरल्याचा संशय आल्यास टाकी उघडून कर्मचाऱ्याला तपासणी करून दाखवायला सांगू शकता. तसे करणे त्यांना बंधनकारक आहे. रिमोटवर नियंत्रित होणारी ‘चिप’पेट्रोलच्या मशीनमध्ये एक खास चीप बसवली जाते. त्याला रिमोटनं नियंत्रित केलं जातं. सेल्समन याला बटणानं कंट्रोल करतो. पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडतं. यानं मीटर सुरू राहतं. मात्र, वाहनधारकाला कमी पेट्रोल मिळतं. ही फसवणूक तांत्रिकदृष्ट्या केली जात असल्याने वाहनधारकांच्या लक्षात येत नाही. तसेच लक्षात आलीच तरी ती सिद्ध करता येत नाही. त्यामुळे फसवणुकीचा उद्देश असलेले पंप चालक अशा चिप मशीनमध्ये वापरतात. ठराविक किमतीच इंधनही कारणीभूतशंभर, दोनशे किंवा पाचशे रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल भरणंही अनेकवेळा फसवणुकीला कारण ठरू शकतं. काही पंपामध्ये मशीनशी छेडछाड करुन त्यांचा वेग वाढवलेला असतो. त्यामुळे मीटर जम्प करतं. जेव्हा वाहनधारक शंभर, दोनशे, पाचशेऐवजी १०५, २२० अथवा ५२५ अया आॅड रकमेचं पेट्रोल टाकतात त्यावेळी म्यॅनुअली पेट्रोल टाकलं जातं. आणि मीटरही जम्प होत नाही..