शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

काही वकीलच म्हणे, लांबवतात 'तारीख पे तारीख.. !'; बार असोसिएशनकडे तक्रारी 

By उद्धव गोडसे | Updated: April 23, 2025 16:50 IST

उद्धव गोडसे  कोल्हापूर : पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे काही वकीलच पक्षकारांचे काम लांबवत आहेत. तारखांवर ...

उद्धव गोडसे कोल्हापूर : पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे काही वकीलच पक्षकारांचे काम लांबवत आहेत. तारखांवर तारखा घेऊन फक्त पैसे उकळतात, अशा पक्षकारांच्या तक्रारी आहेत. गेल्या वर्षभरात जिल्हा बार असोसिएशनकडे वकिलांच्या विरोधात ६० तक्रार अर्ज आले आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडेही तक्रारींचा ओघ वाढत आहेत. त्यामुळे वकिली व्यवसायाला बदनाम करणाऱ्या वकिलांना वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, अशी जुनी म्हण आपल्याकडे आहे. ही पायरी चढण्याची वेळ आलीच तर चांगल्या वकिलांची मदत घ्यावी, असा सल्ला दिला जातो. पण, ज्यांच्यावर विश्वास ठेवून न्यायालयात आपली बाजू मांडायची ते वकील तितके विश्वासू आहेत काय? असा प्रश्न अनेकदा पक्षकारांना पडतो.पक्षकारांची अडवणूक करणाऱ्या काही वकिलांच्या विरोधात जिल्हा बार असोसिएशन, जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि बार कौन्सिलकडे तक्रारी येतात. तक्रारींची पडताळणी करून बार कौन्सिलकडून संबंधित वकिलांवर कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या ६० तक्रारी जिल्हा बार असोसिएशनकडे आल्या. यातील काही तक्रारींमध्ये समेट घडवण्यात यश आले, तर काही तक्रारी कौन्सिलकडे सोपविल्याची माहिती असोसिएशनने दिली.

असे आहे तक्रारींचे स्वरूप

  • किरकोळ वादाच्या खटल्यांमध्ये तारखांवर तारखा घेऊन वेळ घालवणे
  • वाद मिटण्याऐवजी वाढतील असे सल्ले देणे
  • अनाठायी भीती घालणे
  • पक्षकाराच्या कामात दुर्लक्ष किंवा टाळाटाळ करणे
  • पक्षकारांकडून जादा पैसे घेणे
  • अपघात विम्याची रक्कम हडपणे
  • फीसाठी स्थावर, जंगम मालमत्तांचा ताबा घेणे

वकिलीबद्दलच शंकाशिरोळ तालुक्यातील एका वकिलांबद्दल न्यायाधीशांना शंका आली. संबंधित व्यक्ती वकील आहे काय? त्यांच्याकडे सनद आहे काय? त्यांच्या सनदचा नंबर काय? अशी विचारणा त्यांनी पत्राद्वारे जिल्हा बार असोसिएशनकडे केली. तसेच असोसिएशनकडे नोंदणी असलेल्या सर्व वकिलांची यादी मागवली. पण, असोसिएशनकडेच अजून अधिकृत वकिलांची यादी तयार नसल्याची बाब समोर आली आहे.ठोस उपाययोजना गरजेच्याअसोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाला उपयोग होतो म्हणून सनद न तपासता कोणालाही सभासद करणे गैरप्रकारांना प्रात्साहन देणारे ठरू शकते. जिल्ह्यात किती वकील काम करतात? त्यांची दरवर्षी असोसिएशनकडे नोंदणी होते काय? ते नियमानुसार काम करतात काय? यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यरत असायला हवी.

कौटुंबिक वादाच्या किरकोळ गुन्ह्यात अटकेची तरतूद नसतानाही वकिलांनी आम्हाला अटक होण्याची भीती घातली. अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले. आपसात चर्चेतून मिटणारा वाद त्यांनी चिघळत ठेवला. अनावश्यक नोटिसा पाठवून वादात भर घातल्याचा अनुभव आम्हाला आला. - के. बी. पाटील - पक्षकारसगळेच वकील एकसारखे नसतात. फक्त वकिलांमुळेच तारखा लांबतात असे नाही. अनेकदा यासाठी पक्षकार कारणीभूत असतात. न्यायालयात सुरू असलेल्या इतर कामांचाही विचार करावा लागतो. तरीही तक्रारी आल्या याचा अर्थ काहीतरी चुका घडल्या असाव्यात. - ॲड. मारुती पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरadvocateवकिल